



चामोर्शी:: वाढत चालले तापमान आणि पर्यावरणीय बदलामुळे माणसाच्या आयुष्यात फार मोठे बदल घडून आलेले आहे आणि त्यामुळेच माणसाच्या आयुर्मानावर परिणाम दिसत आहेत. त्याकरिता नागरिकांना पर्यावरणीय जीवनपद्धतीशी जुळवून घेण्याकरिता नेहरू युवा केंद्र गडचिरोली आणि शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन संस्थेच्या वतीने मिशन लाईफ (लाईफ फॉर एन्व्हायरमेंट) सुरू करण्यात आले आहे.
नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध भागात हे अभियान राबविण्यात येत आहे, त्याची सुरुवात चामोर्षी तालुक्यातील मालेरचक येथून करण्यात आली.
शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे यांनी उपस्थित युवकांना पर्यावरण पूरक जीवन जगण्याची प्रतिज्ञा दिली. सोबतच योगा प्राणायाम करून निरोगी जीवन जगण्याचा संदेशही युवकांना दिला. यावेळी प्रशांत बोदलकर, मयूर गव्हारे, महेश बोदलकर, नरेंद्र सोनटक्के प्रज्वल नैताम, तिरुपती खोबे, प्रीतम खांडेकर, प्रणय लटारे, सुरज भांडेकर अंकुश वासेकर ज्ञानदीप वासेकर, भूपेश चलाख, सह गावातील युवक आणि न्यू यंग बॉय मंडळ मालेर चक चे सदस्य उपस्थित होते.


