Home महाराष्ट्र जुनी पेन्शन योजना लागू करा – पियूष रेवतकर

जुनी पेन्शन योजना लागू करा – पियूष रेवतकर

158

🔹कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पाठिंबा

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.13मार्च):– महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी,अशी मागणी पियूष रेवतकर प्रदेशाध्यक्ष जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तथा युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे व या मागणीसाठी बेमुदत संपाला पाठिंबा देत असल्याचेही जाहीर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप केला जाणार आहे.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या या मागणीसाठी संघटनेकडून अनेकदा राज्य शासनास निवेदन देण्यात आली आहेत. या संपाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत.जुनी पेन्शन योजना लागू करावी,या मागणीसाठी आम्ही प्रशासनास अनेकदा निवेदन दिली,अनेकदा आंदोलनात सहभाग नोंदवला ,तरी यावर शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही.

त्यामुळे राज्यातील कर्मचा-यांचे पुढील भविष्य अंधारमय दिसत आहे. डिसेंबर 2022 मध्ये नागपूर येथील अधिवेशनात कर्मचाऱ्यांचा मोर्चा बघून मयत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व उपादान देण्यात येईल असे आश्वासन दिले.परंतु त्याचीही पूर्तता करण्यात आली नाही.त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत नाहीत तोपर्यंत 14 मार्च पासून बेमुदत संप करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.या संपाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असे रेवतकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here