Home महाराष्ट्र श्री. श्री. रविशंकरजी यांना गंगाखेड येथे येण्याचे दिले निमंत्रण

श्री. श्री. रविशंकरजी यांना गंगाखेड येथे येण्याचे दिले निमंत्रण

88

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4फेब्रुवारी):-आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन चे संस्थापक पपू श्री रविशंकरजी नांदेड येथे आले असता त्यांना संत जनाबाई यांच्या जन्म स्थान गंगाखेड येथे येण्याचे निमंत्रण ऑड. रेखा रत्नकार गुट्टे यांनी दिले. गंगाखेड हे एक दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते गंगाखेड शहर हे गोदावरी काठा वर बसलेले असून महाराष्ट्रतील प्रसिद्ध संत व कवीयेत्री संत जनाबाई यांचे जन्म स्थान आहे.

गंगाखेड ला महाराष्ट्रतीलआध्यत्मिक क्षेत्रात जनाई नगरी म्हणून ओळखले जाते. आम्हाला आध्यत्मिक बुद्धी देण्यासाठी तुम्हाला गंगाखेड नगरीत मोठया आदराने आमंत्रीत करू इच्छितो आपण आम्हचे निमंत्रन स्वीकार करून गंगाखेड नगरीत उपस्थित राहून मार्गदर्शन करावे. अशी विनंती अध्येक्ष श्री संत जनाबाई संस्थांन गंगाखेड तसेच गंगाखेड विधानसभा चे लोकप्रिय आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी ऑड.रेखा रत्नाकर गुट्टे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन ला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here