🔸संगाबाअवि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मालखेडे यांना श्रद्धांजली
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.4फेब्रुवारी):-विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा – अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबन क्लबद्वारे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ ला महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्याद्वारे सकाळी ८ पासून भव्य रक्तदान शिबीर २०२३ चे आयोजन करण्यात आले प्रसंगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कर्तव्यदक्ष कुलगुरू “द रियल हुमान मशीन” अशी ओळख असलेले स्व. डॉ दिलीप मालखेडे यांना उपस्तित मान्यवर, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली व तदनंतर शिबिराचे अनौपचारिक उघटन करण्यात आले.
या रक्तदान शिबीरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथील रक्तपेढीला पाचारण करण्यात आले. या शिबिरात २२४ बॉटल्सचे संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उघाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉडव्होकेट उदयजी देशमुख व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयीन सल्लागार समिती सदस्य डॉ अजय साखरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले
प्रसंगी श्री प्रमोद मिसाळ, श्री उमेश आगरकर, जिसारु रक्तपेढीचे श्री योगेश पानझडे व त्यांची पूर्ण चमू, संगाबाअवि विद्यार्थी विकासचे डॉ राजीव बोरकर, रासेयो क्षेत्रीय समन्वयक श्री. सारंग धावडे व प्राचार्य डॉ. एम. एस. अली, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक वृंद, शिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या शिबिराला अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दिलीप सौंदळे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. राजेशजी बुरंगे यांनी शूभेच्छा दिल्या. शिबिराच्या आयोजनाकर्ता द केक अवेन्यू चे श्री. अंकित काळे व योजिराज पेंट होऊस चे श्री. मनीष वरणकर व श्री. आवारे यांचे सहकार्य लाभले.
शिबिराचे यशश्वी आयोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिष सायवान यांनी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. गायत्री बहिरे, सह -कार्यक्रम अधिकारी, प्रा शुभम कदम, प्रा. अपर्णा खैरकार, प्रा. नियाज खंदारे, शिबीर विद्यार्थी प्रमुख ऋषिकेश परनकर, तसेच हर्ष माकोडे, सुरज शर्मा, पूजा सोनोने, शंकर उचितकर, प्रथम कोहळे, वेदांत वंदिले, वैष्णवी सोलव, अवंतिका इंगोले, आकांक्षा तायडे, अंशुला तंतरपाडे, समीक्षा केने, औंष वासनिक व सर्व महाविद्यालयीन रासेयो स्वयंसेवक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, उपप्राचार्य प्रा. पि व्ही खांडवे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, सचिव श्री. युवराजसिंगजी चौधरी, सन्माननिय सदस्य श्री. शंकरराव काळे, श्री. नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले व रक्तदान अत्यंत व्यापक स्वरूपात संस्था करीत असल्याचे व हि रक्दानाची चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे यांनी केले तसेच सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




