Home महाराष्ट्र ब्रम्हपुरी महोत्सवात एकल नृत्यामध्ये भारगवी मदनकर प्रथम

ब्रम्हपुरी महोत्सवात एकल नृत्यामध्ये भारगवी मदनकर प्रथम

151

🔸मा. आमदार विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 16 जानेवारी):- ब्रम्हपुरी मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर होऊ घातलेल्या ‘ब्रम्हपुरी महोत्सवात’ विविध प्रकारचे कार्यक्रम ब्रम्हपुरीकरांचे मनोरंजन करीत आहेत. तसेच मनोरंजनासोबत अनेकांना आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी स्टेज मिळालेलं आहे. यामध्ये सोळा वर्षाखालील एकल नृत्या मध्ये भारगवी चंदू मदनकर हिने भाग घेऊन प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. कलेला श्रीमंती किंवा गरिबी असा काहीही भेदभाव नसतो हे भारगवीने आपल्या कलेतून दाखवून दिले आहे.

भारगवी मूळची अर्हेर-नवरगाव ची परंतु आपल्या मुलाबाळांनी किंवा आपले जीवन चांगले जगण्यासाठी चंदू मदनकर वडील हे लग्नापासून ब्रम्हपुरी मध्ये राहायला आले . कष्ट करून मुलांना शिक्षण देवु लागले . आज आपल्या कलेतून ‘ब्रम्हपुरी महोत्सवात’ भारगवी हिने प्रथम बक्षीस मिळवून नाव लौकिक केलं आहे. भारगविला तिच्या मदनकर परिवाराकडून , मित्रमंडळीकडून व ब्रम्हपुरी वाशियाकडून भरभरून कौतुकास्पद अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here