Home महाराष्ट्र इंस्टाग्राम सोशल माध्यमातून काही समाजकंटकांनी पोस्ट टाकून दंगल घडवण्याचा प्रयत्न

इंस्टाग्राम सोशल माध्यमातून काही समाजकंटकांनी पोस्ट टाकून दंगल घडवण्याचा प्रयत्न

128

✒️बळवंत मनव(पुसद प्रतिनिधी)
___________________________
🔸शेंबाळपिंपरी येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला
__________________________
पुसद(दि.16जानेवारी):-खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंबाळ पिंपरी गावात मागील वर्ष २०२२ मध्ये नाम फलका शेजारी नावाचा वादग्रस्त फलक लावून तीळ संक्रांतीच्या दिवशी येथे दोन गटात अंदाजे दोन-तीन तास तुफान दगडफेक होऊन मोठी आर्थिक आणि शारीरिक हानी होऊन गावातील सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता पण तात्काळ पोलीस यंत्रणेने गावातील परिस्थिती आटोक्याबाहेर न जाऊ देता परिस्थितीला पूर्वत सामान्यत आणले होते.

त्या घटनेला उलटून वर्ष होत नाही तर आज १४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्याच्या उद्देशाने एका समाज कंटक युवकांनी त्याच नाम फलकावर वादग्रस्त लिखाण करून अनुसरून इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर अक्षेपाह व्हिडिओ प्रसारित करून पुन्हा दंगल घडविण्याचा प्रयत्न केला . या सविस्तर गंभीर घटनेची माहिती देण्यासाठी येथील काही युवक पोलीस चौकीवर संबंधिताच्या माध्यमातून खंडाळा पोलीस स्टेशन ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू यांना माहिती दिली् असता ठाणेदारांनी योग्य ती कारवाई करण्याची आश्वासन देऊन जनतेला शांततेचे आवाहन केले व कुठल्याही अफवेला बळी न पडण्याचे आव्हान केले.

चौकट……
*तणावपूर्ण शांतता आहे*

सध्या शेंबाळपिंपरीत तणावपुर्ण शांतता असुन उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर, तहसीलदार काळबांडे, खंडाळा ठाणेदार बालाजी शेंगेपल्लु परिस्थितीवर लक्ष ठेवून असुन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आक्षेपार्हे व्हिडिओ टाकणारा हैद्राबाद येथे असल्याचे पोलिसांनी सांगितले.असून त्याच्या समर्थकापैकी कुणालाही वृत्त लिहीपर्यंन्त अटक करण्यात आली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here