Home Breaking News शिरपुर परीसरात तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसांसह ; नाशिकमधील तरुण...

शिरपुर परीसरात तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसांसह ; नाशिकमधील तरुण जाळ्यात

60

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.15जानेवारी):-शिरपूर तालुका परीसरात नॅशनल तस्करी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सात तरुणांच्या मुसक्या शिरपुर पोलिसांनी आवळल्या असुन नाशिक येथिल संशयिताकडुन ३ गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

शिरपूर तालुक्यातील सत्रासेन-भोईटी मार्गवरून एका वाहनातून शस्त्र तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश सिरसाळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

गुरुवार १२ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप पाटील व कर्मचाऱ्यांनी भोईटी-सत्रासेन नाकाबंदी केल्यानंतर संशयित वाहन ( एम.एच १५ टी.सी.५६८८) आल्यानंतर पोलिसांनी इशारा केल्यानंतर वाहन चालकांनी वाहन न थांबवल्याने संशय वाढला व पोलिसांनी पाठलाग अंती वाहन आडवत झडती घेतली असता त्यातील सहा तरुणांकडे ७५ हजार रुपये किंमतीचे ३ गावठी कट्टे मॅगझिन , सहा हजार रुपये किंमतीचे सहा जिवंत काडतुस, एक लाख ८० हजार रुपये किंमतीचे ७ मोबाईल, तसेच ५ लाख रुपये किंमतीची चारचाकी जप्त करण्यात आली आहे.

नाशिक येथिल संशयित आरोपी मोहित राम तेजवानी ( वय-२१) रा. गोदावरी कॉम्प्लेक्स चिंचवड पंचवटी नाशिक, आकाश विलास जाधव ( वय-२४) रा. देह मंदिर सोसायटी विसे चौक गंगापूर रोड नाशिक, राज प्रल्हाद मंदुरिया ( वय-२१) रा.आव्हाड निवास मधुबन कॉलनी पंचवटी नाशिक, अजय जेठा बोरीस ( वय-२९) रा. चैतन्य हाउसिंग सोसायटी रामवाडी पंचवटी नाशिक, श्रीनिवास सुरेंद्र कानडे (वय-२४) रा. दर्शन सोसायटी, विसे मळा कॉलेज रोड नाशिक, दर्शन चमनलाल सिंधी ( वय-२१) रा.होळनाथे, अजंदे बुद्रुक, ता. शिरपुर हया आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here