Home महाराष्ट्र इंदिरा गांधी विद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ, व स्नेहसंमेलन ‘इंदिरा उत्सव’उत्साहात संपन्न…

इंदिरा गांधी विद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ, व स्नेहसंमेलन ‘इंदिरा उत्सव’उत्साहात संपन्न…

145

🔹व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास मोलाचा असतो — नितीनकुमार देवरे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.8जानेवारी):- येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्रा व्ही जी पाटील प्राथमिक विद्यामंदिर,आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक समारंभ व’इंदिरा उत्सव’ वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी जी पाटील,कार्यक्रमाचे उद्घाटक धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार देवरे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सी के पाटील, धरणगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी जीभाऊ पाटील,उपनिरीक्षक मोहन पवार,संचालक मच्छिंद्र पाटील,भरत पाटील, आदर्श विद्यालयाचे संचालक अश्विन पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पर्यवेक्षक ए एस पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तर वार्षिक अहवाल वाचन करतांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील यांनी वर्षभरातील स्पर्धा, कार्यक्रम सण, उत्सव यांचा संख्यात्मक व गुणात्मक विकास, गुणवंत शिक्षक, विद्यार्थी यांच्या कार्याचा लेखा जोखा मांडला तसेच आलेल्या मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरवात अतिशय मंगलमय वातावरणात दीपप्रज्वलनाने झाली. तद्नंतर स्नेहसंमेलन प्रमुख एन बी पाटील यांनी आलेल्या अतिथी मान्यवरांचा परिचय करून दिला. भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या सर्व अतिथींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दोन दिवसीय चाललेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला इयत्ता 10 वी,12 वी च्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक संपादन केलेल्या, राज्य व विभागीय स्तरावर खेळावर यश संपादन केलेल्या,विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक मिळवणाऱ्या,वर्षभरातून आंतर शालेय स्पर्धांमधून यश संपादन करणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळेचे गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक नितीनकुमार देवरे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. “व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास अतिशय मोलाचा असतो”, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात चेअरमन डी जी पाटील यांनी “विद्यार्थी दैवत, विद्यालय मंदिर, व आम्ही त्यांचे पुजारी असे प्रतिपादन केले औपचारिक उदघाटन समारंभ आटोपल्यावर सर्व मान्यवरांनी समोर बसून कार्यक्रमाला मनापासून दाद दिली.

ज्या कार्यक्रमाची सर्व आतुरतेने वाट पाहत होते त्या कार्यक्रमाला सुरवात झाली. वेलकम डान्स, एज्युकेशन थीम, हर हर शंभू, बुम बुम डान्स,देशभक्तीपर नृत्य, मिक्स लावणी, राडा सॉंग, माय भवानी, वेस्टर्न डान्स, कोरोना थीम डान्स, पारंपरिक नृत्य, पथनाट्य, छत्रपती शिवराय पाळणा, मी मोबाईल मय झालो नाटिका, ड्रामा, ओल्ड रिमिक्स, इमोशनल थीम, मेरी माँ के बराबर…, मराठी रिमिक्स, चंद्रा लावणी, कोरोना थीम परफॉर्मन्स, सोलो डान्स, मिरची लावणी मॅशप, डान्स का भूत, पिरॅमिड आणि शेवटी ऑल टीचर्स डान्स अशा एकूण 75 कार्यक्रमांनी आपल्या बहारदार परफॉर्मन्स च्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

नर्सरी च्या चिमुकल्यांपासून ते बारावीच्या विद्यार्थांपर्यंत सर्वांनीच एकापेक्षा एक सादरीकरण करून भारतीय संस्कृती आणि परंपरा, देशभक्ती, कोरोना, देशाच्या समस्या, लोकनृत्य, वेस्टर्न डान्स, पारंपरिक नृत्य, लावणी, आई – वडिलांचे प्रेम, साऊथ इंडियन यांचे दर्शन घडवले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका भारती पाटील,आरती जैन,जेष्ठ शिक्षक डी एम पाटील प्रा सुधीर शिरसाठ, जेष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी केले.

सर्व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी,पत्रकार,छायाचित्रकार,साऊंड सर्व्हिस, मंडप डेकोरेटर सह आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, प्रा व्ही जी पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक बळवंत पाटील,आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.व आभार प्रा जी पी चौधरी यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here