Home महाराष्ट्र समाधान केवटे यांची व्हाँईस ऑफ मीडिया पुसद तालुका अध्यक्षपदी निवड

समाधान केवटे यांची व्हाँईस ऑफ मीडिया पुसद तालुका अध्यक्षपदी निवड

119

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.8जानेवारी):-पत्रकार आणि पत्रकारीता क्षेत्राशी संबंधित पंचसूत्रीवर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, विलास बडे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या पुसद तालुका अध्यक्षपदी निर्भीड आणि स्पष्ट लिखाण करणारे पत्रकार समाधान साधू केवटे. यांची नियुक्ती केली आहे.

पत्रकार दिनानिमित्त त्यांच्या नियुक्तीचे पत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथील विश्रामगृह येथे देण्यात आले.

समाधान केवटे यांची नियुक्ती त्यांचे समाज माध्यमातील लिखाण व पत्रकारितेमधील उज्ज्वल कारकीर्द पाहून ‘व्हाँईस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या पुसद तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

पत्रात म्हटले आहे की आम्ही तुमची नियुक्ती करताना आम्हाला आशा आहे की, आपण खूप गतीने काम कराल. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी. ज्या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर लोकशाहीचा आत्मा जिवंत आहे.

या कार्यक्रमात पुसद येथील लक्ष्मण कांबळे, , प्रा.अंबादास वानखेडे, दिनेश खांडेकर, अरुण बरडे, रवी खरात यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

*चौकट*

*व्हाँईस ऑफ मीडिया संघटनेचा उद्देश व इतिहास*

पत्रकार व पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे जाळे देशातील २१ राज्यांमध्ये पसरले आहे. देशातील विविध ५० संपादकांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली आहे.लवकरच पुसद तालुकाध्यक्ष समाधान केवटे यांच्या नेतृत्वात पुसद तालुक्यात ११ जणांची कार्यकारिणी गठीत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here