Home महाराष्ट्र निफाड येथे सोमवारी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची जिल्हास्तरीय पत्रकार बैठक

निफाड येथे सोमवारी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची जिल्हास्तरीय पत्रकार बैठक

150

✒️निफाड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

निफाड(दि.8जानेवारी):-: बहुद्देशीय राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या अध्यक्षतेखाली निफाड येथील शासकीय विश्रामगृहात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे यांनी दिली. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे, प्रदेश उप सचिव सोमनाथ मानकर प्रदेश संघटक विजय केदारे उपस्थित राहणार आहे.

सोमवार दिनांक ९ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र प्रदेश, उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. यावेळी नूतन कार्यकारी मंडळाची नियुक्तया, सभासदांच्या विविध समस्या संदर्भात चर्चा व आगामी काळात पत्रकार संघाच्यावतीने घेण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमा संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन नाशिक जिल्हा संघटक संतोष आढाव ,व राष्ट्रीय विश्‍वगामी नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here