Home महाराष्ट्र प्रबुद्ध विद्याभवन तालुक्यात नंबर एक इंग्रजी शब्द संग्रह स्पर्धा

प्रबुद्ध विद्याभवन तालुक्यात नंबर एक इंग्रजी शब्द संग्रह स्पर्धा

73

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.1जानेवारी):- डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती फंडच्या वतीने फलटण तालुका स्तरीय English word bank (इंग्रजी शब्द संग्रह ) लेखी स्पर्धा संपन्न झाल्या. मुलांमध्ये इंग्रजी विषयाच्या अभ्यासाची गोडी वाढवणे आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

यामध्ये प्रबुद्ध विद्याभवनच्या सहभागी ९ पैकी ८ विद्यार्थ्यांनी टाॅप थ्री मध्ये नंबर मिळवून फलटण तालुक्यात अव्वल नंबर संपादन केला.स्पर्धेमध्ये फलटण शहरातील कमला निंबकर बालभवन, वेणूताई चव्हाण हायस्कूल, फलटण हायस्कूल फलटण, आनंदवन प्राथ. विद्यामंदीर, उर्दु प्राथ. शाळा, प्रबुद्ध विद्याभवन याबरोबरच तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथ. शाळा चाकशीमळा तरडगाव, जि. प. प्राथ. शाळा खुंटे, जि. प. प्राथ. शाळा सुरवडी, जि. प. प्राथ. शाळा मठाची वाडी, या शाळां-हायस्कूलने सहभाग घेतला.

इंग्रजी शब्द संग्रह स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेलील टाॅप थ्री या प्रमाणे इयत्ता ५ वी, ६वी, ७वी अशा फक्त ९ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला होता.

यामध्ये इयत्ता ७वी प्रथम क्रमांक श्रावणी बाळू काकडे ( प्रबुद्ध विद्याभवन), द्वितीय क्रमांक अंश विशाल अहिवळे (प्रबुद्ध ), तृतीय क्रमांक अदिबा जहांगिर तांबेळी ( कमला निंबकर बालभवन) उत्तेजनार्थ चौथा क्रमांक प्रज्योत राहूल शिंदे ( प्रबुद्ध विद्याभवन ) व पाचवा पराग तुकाराम शिंदे ( कमला निंबकर बालभवन) हे विद्यार्थी यशस्वी झाले.

इयत्ता ६वी प्रथम क्रमांक अक्षरा योगेश घोडके ( प्रबुद्ध विद्याभवन), द्वितीय क्रमांक शेजल दत्तात्रय जगताप (प्रबुद्ध ), तृतीय क्रमांक मोहंमदतलाह जफर कुरेशी ( प्रबुद्ध ) उत्तेजनार्थ चौथा क्रमांक स्मेहा नितीन मोहिते ( जि.प. प्राथ. शाळा – खुंटे ) व पाचवा क्रमांक शब्दश्री भारत घोडके आनंदवन प्राथ.शाळा ) हे विद्यार्थी यशस्वी झाले.

इयत्ता ५ वी प्रथम क्रमांक अंश अमर खरात ( प्रबुद्ध विद्याभवन), द्वितीय क्रमांक संजना संजय माने ( प्रबुद्ध ), तृतीय क्रमांक गाथा संदीप भुजबळ ( कमला निंबकर बालभवन) उत्तेजनार्थ चौथा क्रमांक विश्वजित संदीप कांबळे( जि.प.प्राथ. शाळा- सुरवडी ) व पाचवा क्रमांक स्वरा संतोष पाटणे( जि. प. प्राथ. शाळा- चाळशीमळा , तरडगाव) असे १५ विद्यार्थी यशस्वी झाले.

इंग्रजी शब्द संग्रह स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शाळांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती फंडाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरींची प्रतीमा भेट देण्यात आली.तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सत्कार म्हणून प्रमाणपत्र व वह्या देण्यात आल्या.तसेच स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.संस्थाध्यक्ष प्रबुद्घ सिद्धार्थ, सचीव मिलिंद अहिवळे, नगरसेवक सनी अहिवळे, जयकुमार रणदिवे, विकास काकडे ( आदर्की) , कुणाल काकडे, किशोर पिसाळ, अभिजित कापसे, मंगेश सावंत, नितीन शिंदे, शाम अहिवळे, सागर सोरटे, विजय भोसले यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत, प्रस्तावना संस्थाध्यक्ष सिद्धार्थ अहिवळे, व आभार सचीव मिलिंद अहिवळे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here