Home महाराष्ट्र अन्यायावर वार -भिमा कोरेगाव

अन्यायावर वार -भिमा कोरेगाव

170

भारताचा इतिहास हा विषमता, भेदभाव, अंधविश्वास, अन्याय, अत्याचार, अस्पृश्यता, वर्णवाद, जातीवाद इत्यादी मानुसकी ला काळीमा फासणाऱ्या बाबींनी बरबटलेला आहे. धर्मशास्त्रानुसार माणवाला माणवा पासून दूर केले गेले, माणसाने मानसावर अन्याय केले, मानसाने माणसाला हिन, दुय्यम आणि तुच्छ माणुन विषमता वादी समाज व्यवस्था निर्माण केली. माणसाने माणसाजवळ येऊ नाही म्हणून जातीव्यवस्था निर्माण केली, प्रत्येक जात माणुसकी सोडून आपापल्या ठिकाणी स्वतः ला श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ ठरवण्यात आपली शक्ती शक्ती खर्च करत होत्या आणि आहेत. शिक्षणापासून वंचित ठेवून डोक्यामध्ये विषमता, अंधविश्वास आणि काल्पनिक गोष्टींची पेरणी केल्या मुळे माणसाला माणुसकी सत्यता व तर्कापासुन दुर केले. परंतु भारताची विषेशतः महाराष्ट्राची भुमी ही संत, महापुरुष आणि क्रांतीकारकांची भुमी आहे. येथील संत महापुरुष आणि क्रांतिकारक यांनी नेहमीच अंधविश्वास, विषमता, भेदभाव, अस्पृश्यता यावर प्रहार करून समाजामध्ये समता, न्याय, बंधुता आणि सामाजिक व माणसिक स्वातंत्र्य निर्माण होण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. माणसाला माणसाची वागणूक मिळावी व भेदभाव नष्ट होऊन माणसाला किंमत मिळावी याच वलयाभोवती इतिहासाचे चक्र फिरवत समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून जागृती व प्रगती करण्यासाठी येथील संत महापुरुष व क्रांतिकारक यांनी कधीच तत्वाशी तडजोड केली नाही.

कोरेगाव भिमा अर्थात १ जानेवारी १८१८ चा रणसंग्राम हा अन्यायाच मुळ छाटण्या साठी झालेला रणसंग्राम होता. येथील धर्मग्रंथांनी व धर्माच्या ठेकेदारांनी येथे विषमता एवढ्या मोठ्या प्रमाणात रूजवली होती की, येथे जनावरांना भाकर, मुंगीला साखर आणि माणसाला चाकर अशी विषमतावादी व्यवस्था निर्माण करून माणसाला माणसाचे गुलाम तर बनवलेच होते परंतु जनावरांपेक्षा जास्त हीन वागणूक माणसाला मिळत होती. अस्पृश्यता वाढली होती

अस्पृश्यांना शिक्षण, न्याय, समता आणि बंधुता ह्या गोष्टी तर सोडाच पण माणसाच्या स्पर्शाने येथे माणुस बाटायचा, अन्न बाटायचे, देव बाटायचे, पाणी बाटायचे एवढी प्रखर विषमता आणि द्वेष येथे निर्माण झालेला होता. स्पर्श तर सोडाच परंतु अंगावर सावली जरी पडली तरी व्यक्ती वस्तू देव बाटायचे. एवढ्या मोठ्या प्रमाणात द्वेष, तिरस्कार आणि विषमता ही माणसासोबत माणुसकीलाच काळीमा फासणाऱ्या बाबी येथे होत्या. पेशवाईच्या काळामध्ये तर या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात पाळल्या जायच्या. गावामध्ये फिरताना गावातील सवर्ण लोकांच्या अंगावर सावली पडता कामा नये, गावातून जात असताना पाऊल खुना सुद्धां गावामध्ये राहु नये. पाऊल खुनांचा सुद्धा येथे विटाळ व्हायचा. गावामध्ये थुंकल्याने गाव बाटून जात असे एवढा द्वेष आणि तिरस्कार ज्याला मेंदु आहे आणि तो मेंदु काम करतो असा व्यक्ती करणार पण नाही आणि सहन तर कोणीच करणार नाही. पेशव्यांनी पाऊलखुणा पुसण्यासाठी कमरेला झाडू, थुंकण्यासाठी गळ्यात मडके बांधून लोकांना दिवस मावळल्या नंतर गावामध्ये येण्याची मुभा. उलट अंग मेहणतीचे काम करून घ्यायचे, त्याचा मोबदला द्यायचा नाही. सवर्णातील किहीती लहान लेकराने इतरांना अरेरावी आणि एकेरी शब्दांत बोलायचे परंतु पेशवा लहान जरी असला तरी त्यांना मान सन्मान द्यायचा. कितीही शुर पराक्रमी आणि विद्वान असेल तरीही जातीमुळे मागासले राहावे लागत होते. विषमता, अस्पृश्यता भेदभावाचे चटके लागुन जिवन जगणे असह्य झाले होते.

अन्याय आणि अवमान वाढतच चालला होता. स्वाभिमानी जिवन जगण्याची ईच्छा असुनही तसे जगता येत नव्हते. अन्याया विरुद्ध आग मनामध्ये धगधगत होती. कधी ना कधी उद्रेक होणे निश्चित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक नाकारने, छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या विषमता, द्वेष, पसरवणाऱ्या धर्मग्रंथ आणि धर्माच्या ठेकेदारांनी नियोजित पद्धतीने केलेले कृत्य होते. म्हणजे येथे राजांना धर्मग्रंथ आणि धर्माच्या ठेकेदारांनी छळले. त्यांचा सुद्धा यांनी मुलाहिजा राखला नाही. संभाजी महाराज यांची हाल अपेष्टा करून हत्या केली आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे फेकून देण्यात आले. संभाजी महाराज यांचे नदीमधील तुकडे जमा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि अंत्यसंस्कार हे गोविंद महार यांच्या पुढाकाराने गोविंद महार यांच्याच शेतात केले. संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेण्याची आग मनामध्येच होती. फक्त योग्य संधी आणि वेळ सर्वजन बघत होते. कोणतीही लढाई मैदानात जिंकण्या अगोदर ती मनात जिंकने आवश्यक असते. आणि कोरेगाव भिमाची लढाई पाचशे शुरविरांनी अगोदरच मनामध्ये जिंकली होती, जिवावर उदार होऊन अन्याय अत्याचार अस्पृश्यता विषमता नष्ट करण्यासाठी छातीची ढाल बनवून पेशव्यांना सपासप कापून टाकले.
ब्रिटिश आणि पेशवे यांच्या दरम्यान लढाई साठी ब्रिटीशांकडून नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी मध्ये एकुण 834 सैनिक होते.

पेशव्या कडून बाजीराव पेशवा नेतृत्व करत होता. आणि त्यांच्या सैन्यात 28000 हजार सैन्य होते. 28000 हजारो सैन्या समोर 834 सैनिकांचा निभाव लागणार नाही म्हणून बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री लढाई करणार नाही असे ऐन वेळेवर लढाई मधून माघार घ्यायचा निर्णय घेतला. बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी मध्ये बहुसंख्य महार होते. कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन यांनी जेव्हा माघार घेतली तेव्हा तेव्हा बॉम्बे नेटिव लाईट इन्फेट्री च्या सैन्याने माघार घेण्यासाठी नकार दिला. कारण समोर अन्याय, अत्याचार, व्देष करून अस्पृश्यता पाळणारे पेशवे होते म्हणजे आणि अन्यायाचा बदला घेण्यासाठी ही योग्य संधी आणि वेळ आहे म्हणून सैन्य माघार घेण्यासाठी तयार नव्हते. कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन यांच्या सोबत 334 सैन्यांनी माघार घेतली. परंतु 500 सैन्यांनी माघार न घेता 28000 हजार पेशव्यां सोबत लढून बाजीराव पेशवेला पळता भुई कमी करून टाकली. 500 सैन्यांनी 28000 हजार पेशव्यांना तलवारी च्या जोरावर आणि मनामध्ये पेटलेल्या भावनेने पराभूत केले. कोरेगाव भिमाच्या लढाईने इतिहासाच नाही तर गणित सुद्धां बदलून टाकले. पाचशे शुरविरांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकले गणितात बघितले तर एकाच्या नावावर छप्पन पेशवे आले. तेव्हापासून म्हण पडली होती तुझ्या सारखे छप्पन बघितले. कोरेगाव भिमाची लढाई म्हणजे इतिहासात नोंदवली गेलेली सर्वश्रेष्ठ लढाई आहे. कारण ही लढाई शस्त्राचा जोरावर नाही तर मनाच्या हिंमतीने अन्याय दूर करण्यासाठी लढली गेली होती. 31 डिसेंबर 1817 रोजी सुरू झालेल्या लढाईचा शेवट 1 जानेवारी 1818 रोजी संपली आणि यामध्ये उपाशी पोटी पण मान सन्मान, स्वाभिमान मिळवण्यासाठी महार सैन्यांनी 28000 हजार पेशाव्यांचा खात्मा करून अन्याय, विषमता, व्देष, अस्पृश्यतेवर विजय मिळवला.

आणि मिळवलेला विजय वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना दिली. खऱ्या अर्थाने या लढाईने इतिहासातील धर्मग्रंथ आणि धर्माच्या ठेकेदार यांना तुडवून समतावादी, न्याय वादी व्यवस्था निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण केली. कोरेगाव भिमाची लढाई ही सामाजिक क्रांती आहे. कारण अन्याय, अस्पृश्यता, विषमता चे चटके सहन करणे अशक्य झाले होते. ज्यांनी वरील गोष्टी समाजात पेरल्या त्यांनाच मुळासकट उपटून टाकण्याचे काम पाचशे शुरविरांनी केले. पेशवाई मुळासकट उपटून येथे आन्यायाचा बदला घेतला. स्वाभिमान, सन्मान, शौर्याचे प्रतिक म्हणजे त्यांच्या सन्मानात उभे केलेला जयस्तंभ होय. हा जय स्तंभ स्वाभिमान, शौर्य सन्मानाची जाणीव करून अन्यायाविरुद्ध वेळ व संधी बघुन वार करण्यासाठी प्रेरणा देत असते. म्हणून १ जानेवारी हा दिन शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनी पेशवाई नष्ट करण्यासाठी ज्या शुरविर सैन्यांनी जिवाचे दान दिले अशा शहीदांना मानवंदना.
************************************

✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगांव ता.मेहकर)मो:-9130979300
*************************************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here