Home महाराष्ट्र पुसद उपजिल्हा रुग्णालयात औषधीचा तुटवडा…!!

पुसद उपजिल्हा रुग्णालयात औषधीचा तुटवडा…!!

74

🔹प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलांना मोजावे लागत आहे सातशे रुपये ते एक हजार रुपया मागणी…!

🔸पुसद येथील उपजिल्हा रूग्नालयाचा भोगंळा कारोभार याकडे वरीष्ठ जातीने लक्ष देतील का..
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.1जानेवारी):-स्थानिक पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयाची भव्य इमारत आसुन पुसदला अनेक खेडेपाडे परीसर जोडलेली आहेत. आणी त्यामुळे गोरगरीब जनतेसाठी व रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय एक आशेचे किरण आहे. परंतु प्रशासनाचा गलथन कारभारामुळे व निष्क्रियतेमुळे रुग्णांना मात्र उपचार व औषधी न घेताच आल्या पावली परत जावे लागते. रुग्णालयात औषधी संपली असून बाहेरून घ्यावी लागते असे सांगितले जाते. जर रुग्णांची बाहेर इलाज करून औषधी घेण्याची ऐैपत असती तर ते सरकारी रुग्णालयात आलेच नसते, ही बाब यांच्या लक्षात का येत नसेल..? ह्या शिवाय प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना सातशे रुपयाची मागणी देखील केली जाते आणि थेट पैसे प्रभारी अधीक्षकाकडे जात असल्याची खळबळ जनक चर्चा आहे.

जर हे असे रुग्णांकडून पैसे उकळत असतील तर बाहेरगावुन आलेल्या सर्वसामाण्य महीलेची आणि नातेवाईकाची अशी जर लुट होत असेल तर या बाबत वरीष्ठ जातीने लक्ष का देत नसतील हि फार मोठी शोंकातीका म्हनाव लागेल.कारण उपचारासाठी आलेल्या रुग्णांना औषधी नसल्याचे सांगून परत पाठवत असतील तर ही रुग्णालयातील औषधी जाते कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. सरळ ही औषधी बाहेरून घेऊन येण्याचा सल्ला देतात ही का..? औषधी बाहेर उपलब्ध असल्याचे यांना कसे माहिती असते कसे व कुठे पाणी मुरते अशी शंका येणे सहाजिकच आहे.

एका रुग्णाला उंदीर चावल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात गेला होता. त्याने रीतसर पावती घेतली डॉक्टरांनी टी. टी. चे इंजेक्शन लिहून दिले तो इंजेक्शन घेण्यासाठी गेला असता सदर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले. नंतर तो रुग्ण प्रभारी अधीक्षकाकडे गेला त्यांनी बाहेर जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला. त्या रुग्णांनी बाहेर येऊन चौकशी केली असता बाहेरून मेडिकल मधून औषधी घेऊन येण्याचे सांगण्यात आले. एकंदरीत रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा यांचा चांगलाच फंडा असून प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना मात्र घालतात गंडा. तो रुग्ण पुन्हा प्रभारी अधीक्षकाकडे परत गेला असता त्यांनी कुत्र्याचे इंजेक्शन घेण्याचे सांगितले व पावतीवर तसे लिहून सुद्धा दिले.

टी. टी. चे इंजेक्शन नसल्यामुळे आता कुत्रा चावल्याचे इंजेक्शन घेऊन टाका असा अफलातून परत सल्ला देण्यात आला असा रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अधिकारी व कर्मचारी खेळत असल्याचा अनुभवात येत आहे. रुग्णालयात येणारी औषधी कुठून येते व कोठे जाते याची चौकशी करण्याची चर्चा रुग्णांमध्ये होत असल्याचे ऐकीवात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here