Home Education शुभांगीच्या स्वप्नांना आ.डॉ.गुट्टेंनी दिले आर्थिक बळ ‘ती’ होणार डॉक्टर : आई-वडील...

शुभांगीच्या स्वप्नांना आ.डॉ.गुट्टेंनी दिले आर्थिक बळ ‘ती’ होणार डॉक्टर : आई-वडील गहिवरले

69

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26डिसेंबर):-वडील शेतकरी..आई गृहिणी..अल्प शेती..काही वेगळे करण्याची इच्छा..’ती’ला आई-वडीलांचे पाठबळ..मग ‘ती’ने भरपूर मेहनत केली..रात्रीचा दिवस केला..अन वैद्यकीय अर्थात बीएएमएस करीता प्रवेश मिळविला..पण, पैशाची अडचण.. एकीकडे आनंद..तर दुसरीकडे अडचणींचा डोंगर..मात्र, ‘ती’ने जिद्द सोडली नाही..’ती’ची व्यथा एका पदधिकाऱ्याने संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या कानावर घातली.
तेव्हा सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संवेदनशील मनाच्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी ‘ती’चा शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. आणि तातडीने ‘ती’ची शैक्षणिक आणि वसतीगृह शुल्क भरले. त्यामुळे ‘ती’चे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

याबाबत सविस्तर असे की, पूर्णा तालुक्यातील कळगाव येथील शुभांगी रुस्तुम माने हि शेतकरी कन्या. लहानपणापासून ‘ती’ अभ्यासात हुशार. घरच्या गरीबीची जाण असलेली शुभांगी शेतात आई-वडीलांना मदत करते. अभ्यासात सातत्य आणि चिकाटी ठेवल्याने ‘ती’ दहावीत ९०.९६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर ‘ती’ने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. डॉक्टर होण्याच्या जिद्दीने ‘ती’ने बारावीत ७५.३८ टक्के गुण मिळविले. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये ‘ती’ने गुणांच्या आधारावर कोल्हापूरच्या डॉ.दीपक पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. दरम्यान कोरोनाची लाट आली. त्यामुळे ‘ती’ने घरीच अभ्यास केला.

मात्र, कोरोनाच्या नंतर ‘ती’ला शैक्षणिक व निवासी शुल्क भरल्याशिवाय महाविद्यालयात बसता येणार नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे वडील रुस्तुम माने विचारात पडले. पैशाची जुळवा-जुळव करण्यासाठी धडपड करु लागले. हि बाब ताडकळस येथील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे युवा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मारोती मोहिते यांना समजली. त्यामुळे त्यांनी आ.डॉ.गुट्टेंना हि व्यथा सांगितली.

त्यानंतर आ.डॉ.गुट्टे यांनी रुस्तुम माने यांच्या कुटुंबियाशी भेटून आपुलकीने विचारपूस केली. अन शुभांगीची शैक्षणिक व निवासी शुल्क एकरकमी भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माने परिवारास प्रचंड आनंद झाला.

मी डॉक्टर होण्याचं स्वप्न लहानपणी पाहिलं आहे. त्यामुळे मी भरपूर अभ्यास करीत आहे. परंतु पैशाची अडचण होती. मात्र, आमदार साहेबांनी दिलेला मदतीचा हात आधार देणारा आहे. मला डॉक्टर होऊन गोरगरीबांची सेवा करायची आहे, असा निर्धार शुभांगी माने हिने भ्रमणध्वनीद्वारे बोलून दाखविला आहे.

दरम्यान, आ.डॉ.गुट्टेंनी शुल्क भरल्यामुळे शुभांगी माने कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यामुळे शुभांगीच्या स्वप्नांना आ.डॉ.गुट्टेंनी दिले बळ, असे जिल्ह्यातील नागरिक म्हणत आहेत.

आमदार साहेब पांडूरंग हायेत…आमची शुभांगी लय हुशार. दहावी-बारावीत ‘ती’नं चांगली मार्क मिळवली. बीएएमएसला ‘ती’ला प्रवेश मिळाला. परंतु पैशाची अडचण होती. अशावेळी आमदार साहेब देव होऊन धावून आले नि आमची अडचण दूर झाली. त्यामुळे संकटात धावून येणारा माणूस पांडूरंगचं असतो. म्हणून आमचं आमदार सायेब पांडूरंग हायती, अशी भावनिक प्रतिक्रिया शुभांगीचे वडील रुस्तुम माने यांनी दिली.यशाला कधीच शॉटकट नसतो – आ.डॉ.गुट्टे
गुण आणि कौशल्य कधी विकत घेता येत नाहीत. ती जिद्द आणि परिश्रमाने विकसित करावी लागतात. मेहनत घेणारा यशस्वी होतो. कारण, कष्टाचा सुगंध नेहमी दरवळत असतो. म्हणून यशाला कधीच शॉटकट नसतो. हे शुभांगी माने या तरुणीने दाखवून दिले आहे, असे गौरोद्गार आ.डॉ.गुट्टे यांनी काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here