Home महाराष्ट्र ल.पु.कांबळे यांची दि बुध्दिष्ट पेन्शनर सोशियल आसोसिएशन यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

ल.पु.कांबळे यांची दि बुध्दिष्ट पेन्शनर सोशियल आसोसिएशन यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

94

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26डिसेंबर):-दि बुद्धिष्ट पेन्शनर सोशियल असोसिएशन यवतमाळ जिल्हा यांची दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी रवींद्र टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल सेलिब्रेशन हॉल अँड ट्रेनिंग सेंटर( बचत भवन ) मेडिकल चौक ,स्व.व.ना. मेडिकल कॉलेज समोर यवतमाळ येथे वार्षिक आमसभा पार पडली.

दि बुध्दिष्ट पेन्शनर सोशियल असोसिएशन यवतमाळच्या उपाध्यक्ष म्हणून भारतीय बौध्द महासभा पुसदचे शहराध्यक्ष तसेच पतंजली योगसमिती पुसद भारत स्वाभिमान न्यास सहप्रभारी ल पुं.कांबळे (से.नि.शिक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली.

पुसद तालुका शाखा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बनसोड, के.के .दिघाडे, सोपन वैराळे, यशकुमार भरणे, विजय स्थुल,तुकाराम चौरे,साहेबराव गुजर,प्रल्हाद खडसे, हिरामण खंदारे, चंद्रकांत आठवले, मारोतराव खंदारे, यांनी तसेच इत्यादीनी अभिनंदनाचा वर्षाव केला.व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here