Home नांदेड दिव्यांगांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज -डॉ. रविप्रकाश सिंह

दिव्यांगांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज -डॉ. रविप्रकाश सिंह

113

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नांदेड(दि.5डिसेंबर):-दिव्यांगांच्या विकासासाठी शासनच नव्हे तर सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादननवी मुंबईच्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सशक्तिकरण संस्थाचे प्रभारी अधिकारी डॉ. रविप्रकाश सिंह यांनी केले आहे.

समेकित क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तिकरण संस्थान ,नागपूर आणि गीताई प्रतिष्ठान ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ३ डिसेम्बर रोजी आंतरराष्टीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग ,पालक ,आणि विशेष शिक्षक यांच्यासाठी “सर्वसमावेशक विकास परिवर्तनात्मक उपाय: सुगम्य आणि योग्य जगाला चालना देण्यासाठी नवकल्पनाची भूमिका “या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ. रविप्रकाश सिंह बोलत होते या प्रसंगी कार्यक्रमांचे संचलन,समन्वयन जगन मुदगड़े यांनी केले या वेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती .
पुढे बोलतांना डॉ. रविप्रकाश सिंह म्हणाले की, दिव्यांग आणि इतर वंचित घटकांसह सर्व समाजाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे या साठी सर्वानी प्रयन्त करणे गरजेचे आहे.

सामाजिक न्याय ,समान अधिकार, संधीची समानता , स्वातंत्र्य आणि समावेशी समाजातच दिव्यांग व्यक्तिच्या व्यक्तिमत्वचा सर्वांगीण विकास होतो. दिव्यांग आणि इतर वंचित समाजासाठी शिक्षण , प्रशिक्षण आणि पुनर्वसन करीता सरकारी योजनाची माहिती आणि त्याची लाभ प्राप्ती ,शासकीय व अशासकीय संस्थानी अधिक गतिमान होऊन कार्य करने गरजेचे आहे. दिव्यांगाचे विविध प्रकार , त्यांच्या क्षमता -अक्षमता ,गरज ,आवश्यकता याबाबत समाजात जनजागृति कार्यक्रम ,पालक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे.

दिव्यांगजन समावेशनाचे प्रमुख अडथळे दूर करुण समाजाची आणि परिवाराची दिव्यांग पुनर्वसनात सक्रियता , सुगम्य आणि अडथळ्यविरहित वाता वरण पुरवणे , न्यासंगत समान शिक्षण व प्रशिक्षण , स्वातंत्र्य ,समान अधिकार आणि संधी देवूनच सर्व समावेशी समाज निर्माण करता येईल.सर्व समावेशी समाजाच्या विकासासाठी सरकारच्या भूमिकेबरोबरच समाजाच्या सर्व घटकानी योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यक्रमांचे संचलनव उपस्थितांचे आभार जगन मुदगड़े यानी मानले कार्यक्रमास नांदेड,लातूर,अकोला,जलगव,नागपूर,वाशिम नाशिक,औरंगाबाद आदी राज्यातील विविध जिल्ह्यातील दिव्यांग बांधव , पालक आणि या क्षेत्रांतील अधिकारी ,विशेष शिक्षक यांचा सक्रिय सहभाग होता.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कृती अंगीकृत करणारा भारत घडवूया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here