
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.5डिसेंबर):-येथील वकील दिनाच्या निमित्ताने वकील मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील न्याय देण्याच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्त्यांनी पार पाडला.
कायद्याच्या अभ्यासातून लोकांना कायदेशीर मार्गदर्शना सोबतच न्याय मिळवून देण्यासाठी वकील आपले कार्य करीत असतो. अशात आपल्या कार्यातून आपल्या वकिली व्यवसायातील समर्पित भावनेने काम करणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशांमध्ये वकील दिन साजरा करण्यात येतो. दुसऱ्यांना न्याय मिळवून देताना वकिलांना घ्यावे लागणारे परिश्रम वाखानण्याजोगे आहे. आज वकील दिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करणे त्यांना न्यायदानाच्या दृष्टीने यश प्राप्तीसाठी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करणे समाजाचे कर्तव्य आहे.
त्याच उदात्त भावनेने आज पुसद न्यायालयामध्ये शुभेच्छा देण्यासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे, , सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मेटकर, निलेश राठोड मोहा यांनी सर्व वकिलांना शुभेच्छा देवून स्तुत्य उपक्रम राबविला. याबद्दल पुसद वकील संघाकडून या आभार व्यक्त करण्यात आले.
