✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.2डिसेंबर):- गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयत राष्ट्रीय सेवा योजना (वरिष्ठ व कनिष्ठ), नेहरू युवा केंद्र, इनर व्हील क्लब, एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुटीर रुग्णालय उमरखेड यांचे द्वारे जागतिक एड्स दिन विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा घेऊन सजरा करण्यात आला व विद्यार्थिनींना पारितोषिके देण्यात आली, या प्रसंगी राष्ट्रीय योजना चे कार्यक्रम अधिकारी सर्व विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.
दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्तकार्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे.
सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशाशकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात.
2017 पर्यंत, एड्समुळे जगभरात 2.89 कोटी ते 41.5 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे 3.67कोटी लोक एचआयव्ही सह जगत आहेत.ज्यामुळे हे अभिलिखित इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे.
हा दिवस 1998 मध्ये सुरू करण्यात आला आणि दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो, जागतिक एड्स दिन हा जागतिक स्तरावर पहिल्यांदाच आरोग्य दिन साजरा करण्यात आला. हा दिवस जगभरातील प्रत्येकासाठी या आजाराविरुद्धच्या लढाईत एकत्र येण्याची आणि एचआयव्हीने पीडित असलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच या आजारामुळे ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या स्मरणार्थ उभे राहण्याची संधी आहे.
1988 च्या यूएस अध्यक्षीय निवडणुका आणि ख्रिसमस यामधील माध्यमांच्या अंतराचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी जागतिक एड्स दिन साजरा करण्याची कल्पना मांडण्यात आली.
“जागतिक एड्स दिन” साजरा करण्यासाठी इनर व्हील क्लब च्या डॉ. सौ विमल राऊत ,सौ शिला कदम (अध्यक्ष),सौ. कुसूम गिरी, सौ.मनिषा काळेश्वरकर, सौ. कविता गंगासागर , सौ प्रतिभा मालपे, सौ प्रज्ञा कस्तुरे, सौ. वसुंधरा शिंदे, सौ. ममता कस्तुरे, सौ.नंदा येनकर उपस्थित होत्या उद्या सोबतच कुटीर रुग्णालय उमरखेड येथील सौ घोंगडे मॅडम आल्या होत्या व त्यांनी एड्स बद्दल बरीचशी माहिती दिली व जनजागृती केली.
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. सौ. ए. पी. मिटके, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. इंगळे, प्रा. सौ. एस. बी. भुतडा, प्रा. डॉ. यू. एन. पाटिल, प्रा. डॉ.एस. व्ही. सुर्वे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.