Home महाराष्ट्र महिलेच्या प्रेताचे विटंबना करणारे ॲट्रॉसिटीच्या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करा

महिलेच्या प्रेताचे विटंबना करणारे ॲट्रॉसिटीच्या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करा

349

🔸सामाजिक संघटनांनी निषेध मोर्चाद्वारे केली मागणी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

धरणगाव(दि.2डिसेंबर):-23 नोव्हेंबर रोजी बोरगडी येथील सरकारी स्मशान भूमीमध्ये गावकऱ्यांनी शकुंतलाबाई ढगे यांच्यावर अंत्यसंस्कार करीत असताना आशाताई कदम व त्यांच्या साथीदारांनी अंत्यविधी करण्यास मज्जाव केला व सरणावर बसून जातीवाचक शिवीगाळ करून वाद निर्माण केल्याने एकच खळबळ उडाली होती.

या घटनेनंतर गावकरी तथा समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन पुसद शहर येथे दिलेल्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले. परंतु एवढी गंभीर घटना घडवून सुद्धा आरोपीस अटक केली नाही याउलट त्यांच्याकङून देण्यात आलेल्या खोट्या रिपोर्ट वरून गावातील सरपंच पोलीस पाटील व प्रतिष्ठित व्यक्तीविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले.

यामुळे गावात व समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. अशा घटनेचा निषेध नोंदवण्यात सोबतच दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावे या मागणीसाठी आज तीन पुतळा चौक पुसद येथून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सदरचा मोर्चा दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ,मार्गे सुभाषचंद्र बोस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मार्गाने महात्मा गांधी चौकातून थेट तहसील कार्यालयावर पोहोचला. खोटे गुन्हे मागे घ्या आरोपीला तात्काळ अटक करा अशा घोषणा देत मोर्चेकर्‍यांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. तहसील चौकामध्ये सदर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या ठिकाणी.आर.पी.आय.आठवले शहर अध्यक्ष लक्ष्मण कांबळे. भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, पिरीपाचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष बाबाराव उबाळे, दिनेश खांडेकर तसेच भिम टायगर सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष गीताताई कांबळे यांनी मोर्चामध्ये सामील महिला पुरुष युवकांना घटनेची संपूर्ण हकीगत सांगून अशा अन्याय अत्याचाराच्या घटनांवर रोख लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलावी व आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी केली.

तसेच शेकडो समाज बांधवांनी व कार्यकर्त्यांनी निवेदनावर सह्या करून आपला निषेध व्यक्त केला.मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी पुसद यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार गणेश कदम यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठ स्तरावर निवेदन पाठवून योग्य ती दखल घेणार असल्याचे मोर्चेकर यांना सांगितले. या मोर्चामध्ये पुसद तालुक्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भीमशक्ती शिवशक्तीच्या मुद्द्यावर आता वावड्या उडवू नका!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here