Home पुणे अनाथ व वंचित मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य – दिग्दर्शक...

अनाथ व वंचित मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य – दिग्दर्शक रामकुमार शेडगे

163

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.2डिसेंबर):-जनसंपर्क मिडिया सर्व्हिसेस व दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी बालदिन त्यांचा वाढदिवस अनाथ व वंचित मुलांसोबत उत्साहात साजरा केला. या प्रसंगी गुलाबांची फुले, रंगीबेरंगी फुगे, शुभेच्छा पत्रके, नक्षीदार टोप्या यावेळी मुलांनी डोक्यात परिधान केल्या होत्या. हवेत फुगे सोडून मुलांनी यावेळी आनंद साजरा केला. तसेच याचबरोबर मुलांना खाऊचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिनेता आशुतोष भोसले, दीपक आवळे, गायक प्रशांत निकम तसेच अलका फाउंडेशनच्या अलका गुंजनाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला रामकुमार शेडगे यांनी अनाथ व वंचित मुलांशी संवाद साधला व यावेळी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील विविध अनुभव सांगितले. त्याच बरोबर मुलांना चित्रपटसृष्टीत विनोदी किस्से सांगून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

या प्रसंगी रामकुमार शेडगे म्हणाले की प्रत्येक मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अनाथ व वंचित मुलांच्या आयुष्यात बालदिनी आनंद पेरताना विशेष आनंद होतोय.

२९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आणि पितृभाषा

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष भोसले यांनी केले तर आभार रामकुमार शेडगे यांनी मानले.

गाढवाने शेत खाल्ले… पाप ना पुण्य!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here