अपंग व्यक्तींना सहाय्य करणे म्हणजे त्यांना विविध कामे करण्यास पात्र करणे आणि त्यांच्यातील कौशल्ये विकसित करणे. आज समाजात खूप प्रकारची कामे अशी आहेत ज्यांना अपंग व्यक्ती करू शकतात. त्यांच्यापर्यंत फक्त तशा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.
आज एकाच अशा दिव्यांग विद्यार्थ्यांची कामगिरी या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया.तर पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे या छोट्याशा खेडेगावात राहणारा दिव्यांग विद्यार्थी म्हणजे स्वप्निल मनोहर गोरे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले आणि अकरावी बारावी करिता कला शाखेतून शिक्षण घेण्याकरिता तो मुंगसाजी आदिवासी आश्रम शाळा माणिकडोह येथे गेला चांगल्या गुणांनी तो बारावी उत्तीर्ण झाला जवळपास 74 टक्के त्याला मिळाले होते त्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्याकरिता ते फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे त्यांनी प्रवेश मिळवला व व बीए मध्ये मराठी साहित्य हा विषय निवडून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले तर सन 2020-21 साली त्यांनी बीए प्रथम वर्षाला ऍडमिशन घेतले आणि अभ्यासाला सुरुवात केली.
मराठी साहित्य विषयी असल्यामुळे त्याला साहित्यात रस निर्माण व्हायला लागला आणि कोरोना काळामध्ये ऑनलाईन क्लासेस असल्याकारणाने पूर्ण वेळ घरीच असायचा मग त्यांनी विचार केला की या कोरोना काळाचा फायदा घेतला पाहिजे मग तो सहजच कविता करायला लागला आणि त्यांनी “प्रेमाची पहाट” ही पहिली कविता लिहिली आणि आपल्यापेक्षा मोठ्या अनुभवी व्यक्तीला त्यांनी ती कविता दाखवली व परीक्षकांना सुद्धा ती कविता फार आवडली आणि त्यांनी स्वप्निल गोरेला सुचविले की तुझ्यामध्ये कविता निर्माण करण्याचे कौशल्य आहे तू अधिक चांगल्या प्रकारे कविता करू शकतोस तू तुझा लिखाण चालू कर खर्च आम्ही देतो असे आश्वासन मित्रांकडून मिळाले त्यानंतर तो उत्स्फूर्तपणे कविता लिहायला लागला आणि आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक प्रेमी रचनाकार म्हणून तो नावारुपास येत आहे.
सध्या तो बीए तृतीय वर्षाला आहे आणि कविता लिहिणे हा त्याचा छंद आहे आणि एमपीएससी पास करून एखादी पोस्ट मिळवणे हे त्याचे ध्येय आहे परंतु त्याचा छंद आणि ध्येय या दोन्हीकडे तो सारख्याच नजरेने पाहतो आणि विशेषता तो डोळ्यांनी 75 टक्के अंध आहे तर आता विचार करा जर त्याने ठरवलं नसतं किंवा मी एक चांगला कवी होऊ शकतो किंवा त्याच्या मित्रांनी त्याला पाठिंबा दिला नसता तर तो आज स्वतःचा अस्तित्व निर्माण करू शकला नसता.
महाविद्यालयामध्ये सुद्धा तो ऍक्टिव्ह असतो आणि सरांनी कुठल्याही ऍक्टिव्हिटी सांगा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोच बीए प्रथम वर्षापासून ते बीए तृतीय वर्षापर्यंत त्याने महाविद्यालयातील विविध अभ्यास मंडळामध्ये सदस्य ते अध्यक्षापर्यंत पद भूषविले आहे त्याचा आढावा आपण थोडक्यात घेऊया.
1) कल्पना वार्षिक अंकासाठी हिंदी मराठी इंग्रजी तिन्ही भाषेतून कवितेचे लिखाण (2021)
2) सदस्य
समाज विज्ञान अभ्यास मंडळ(2021-22)
2) कल्पना वार्षिक अंकासाठी मराठी इंग्रजी विषयात कविता व लेखांचे लिखाण(2022)
3) जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत सहभाग (वाशिम 2021)
4) सदस्य
मराठी भाषा आणि वांग्मय अभ्यास मंडळ(2021-22)
5) विभागीय ऑनलाईन कविता स्पर्धा विजेता (2021)
6) अध्यक्ष
मराठी कवितांचे जग साहित्यसमूह(2022)
7) यवतमाळ जिल्हाध्यक्ष
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच (01/08/2022)
8) अध्यक्ष
इतिहास अभ्यास मंडळ(2022-23)
9) अध्यक्ष
समाजशास्त्र अभ्यास मंडळ (2022-23)
10) अध्यक्ष
समाज विज्ञान अभ्यास मंडळ (2022-23)
11) आयोजक
राज्यशास्त्र अभ्यास मंडळ (2022-23)
12) सदस्य
women development sale xender equality 2022
13) प्रेमी रचनाकार म्हणून वेगळी ओळख निर्माण ( 2022)
14) मनातील कविता या काव्यसंग्रहात माझ्या कवितेला स्थान (11/20/2022)
15) सदस्य
काव्यप्रेमी अभ्यासक मंडळ
16) कल्पना वार्षिक अंकामध्ये सन 2020 21 या सत्रात इंग्लिश विषयातून विद्यार्थी संपादक मंडळामध्ये सहभाग.