Home महाराष्ट्र राजकारणातील उघड जातीवाद

राजकारणातील उघड जातीवाद

0

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आणि भारतीय लोकशाहीच्या प्रस्तावने मध्येच आम्ही धर्म निरपेक्षतेचा स्विकारत केला आहे. आम्ही धर्म निरपेक्ष लोकशाही संविधानीक स्विकार केला असला तरी वास्तविक आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत का? हा खुप गंभीर, चिंतनीय प्रश्न तर आहेच परंतु याचे उत्तर जर नाही असेल तर भारतीय संविधानाच्या मुळ गाभ्याला सुरुंग लावण्यासारखे आहे. कारण संविधानाचा मुळ गाभा हा संविधानाची प्रस्तावना आहे, प्रस्तावने मध्ये जर धर्म निरपेक्षता असेल आणि देशात धर्म निरपेक्षतेचे वातावरण नसेल तर धर्म निरपेक्षतेचे पालन न करणाऱ्या पक्ष संघटना व्यक्ती यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

कितीतरी लोक संविधान, लोकशाही, समता या बाबतीत बोलतात लिहतात परंतु धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये निवडणूक, सरकार स्थापनेमध्ये जाहीर धर्माचा उल्लेख करून मत मागुन, धार्मिक भावनिक करून लोकांची दिशाभूल केली जाते हे लोकशाहीस घातक आहे. धर्म, पंथ,लिंग, वर्ण याचा कोणताही आधार न घेता फक्त आणि फक्त लोक हित मुलभूत हक्क, सामाजिक न्याय, शिक्षण आरोग्य, मुलभूत सुविधा या आधारावर राजकारण करून वरील मुद्यांना न्याय देण्यासाठी सरकार स्थापन व्हायला पाहिजे आणि सरकारने वरिल मुद्यावर वरच राजकारण करायला पाहिजे. परंतु देशातील परिस्थिती बघितली तर या उलट दिसत आहे शिक्षण,रोजगार,आरोग्य, मुलभूत सुविधा, मुलभूत अधिकाराचे हनन होऊन फक्त आणि फक्त धर्माशी केंद्रित राजकारण केले जाते. आणि लोकांना जर धर्माचा विसर पडला तर सरकारच्या माध्यमातून वारंवार धर्माची जाणीव करून दिली जाते. आज आपण बोलतोय देशातील जातीवाद संपत आहे.

समता प्रस्थापित होत आहे पण हे पुर्ण सत्य नाही. सरकार आणि वेगवेगळ्या माध्यमांच्या मार्फत आजही देशात जातीवाद, धर्मवाद बळकट झालेला आहे याचे लाखो उदाहरणे आपणास वेगवेगळ्या मार्गाने बघायला मिळतात. राजकारणाच्या माध्यमातून उघड जातीवाद, धर्मवाद कसा केला जातो याचे उदाहरणे बघितलं तर खुपच खेद जनक आहेत. आपण फार पुर्विचे नाही पण मागिल काही चर्चीत प्रकरणे बघितले तर आपल्या लक्षात येते आजही जातीवाद, धर्मवाद कायम आहे. आणि सत्तेमधील लोक, प्रसार माध्यमे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जातीवाद वाढवण्यास, कायम ठेवण्यास मदत करतात. सध्याचेच प्रकरण बघितले तर श्रद्धा चे प्रकरण. श्रद्धा ची हत्या ही निष्ठूर आणि निर्दयपणे झालेली आहे. हे सत्य आहे. या नंतर अशी वेळ कोणत्याही मुलीवर येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करणे आवश्यक परंतु मुलीच्या सुरक्षितता आणि संरक्षण यावर कोणी न बोलता श्रद्धाचा मारेकरी आफताब आहे म्हणून लव जिहाद वर बोलत आहेत.

मुळात प्रश्न आहे महिला सुरक्षा आणि संरक्षणाचा परंतु वलय दिले जात आहे लव जिहाद चे. थोडक्यात काय तर धार्मिक वाद, तेढ आणि धार्मिक दुरावा कसा निर्माण होईल यावरच भर देण्यात आहे. आफताब पुनावाला हा नॉन मुस्लिम आहे तरीही काही बुद्धीने अंपग असलेले विचारवंत, माध्यमे आणि राजकीय पक्षाचे नेते लव जिहाद वर कायम आहेत आता यांना काय म्हणावं यासासाठी शब्दच शिल्लक नसतात. प्रकरण समजून न घेता धार्मिक वातावरण दुषित होत असेल आणि सरकार व सरकार नियंत्रित यंत्रणा त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करत असतील तर याचा अर्थ येथे जातीवाद, धर्म वाद कायम आहे.

दुसरे उदाहरण बघायचे झाले तर ज्या ज्या वेळी सावरकर यांच्या पत्रापविषयी कोणीही बोलले तर आपल्या महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री सावरकरांचा अवमान समजून सावरकरां विषयी एकही अपशब्द खपवून घेणार नाही असा पवित्रा घेतात. पत्र सावरकर यांनीच लिहलेली आहेत, सरकार दरबारी त्याची नोंद आहे, तरीही ते म्हणतात सावरकर यांच्या पत्रापविषयी बोलुन त्यांचा अवमान करू नका. बर ते एवढ्यावरच बोलुन थांबत नाहीत तर सावरकरांविषयी पत्राचा विषय विधानसभेत मध्ये मांडून सावरकर शुरविर, परक्रमी कसे होते, त्यांनी किती अन्याय अत्याचार सहन केले यावर मत मांडून महती सांगतात. मी सावरकर ची टोपी घालुन सावरकरांचा अवमान म्हणजे संपूर्ण देशाचा अवमान आहे अस सांगतात, त्यांच्या मते नासिक साहित्य संमेलनामध्ये सावरकरांचा अवमान होतो म्हणून ते साहित्य संमेलनाला हजर राहत नाहीत. सावरकरांच्या पत्रावर कोणी बोलले तर बोलणाऱ्याला माफी माघायचा जबरदस्ती करतात.

सावरकरांविषयी सावरकरांच्या पत्राबद्दल सत्य इतिहास त्यांना मान्य नसतो. परंतु खोले बाई छत्रपती शिवरायांचा फोटो बघुन घरातील अन्न अपवित्र झाले असे म्हणते, मध्य प्रदेश सरकार छत्रपती शिवरायांचा पुतळा जेसीबी लाऊन अवमान करून काढून टाकते, सिंदम सारखा तोंडातुन घाण ओकतो, वडेट्टीवार छत्रपती शिवारायांच्या पायावर उभे राहून छत्रपतींना हार घालतात, कोशारी छत्रपती शिवरायांना जुन्या काळातील आदर्श म्हणतात, त्रिवेदी छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी पाच पत्र लिहले म्हणतात तेव्हा मात्र आमचे माजी मुख्यमंत्री सर्वात अगोदर म्हणतात अस घडलेच नाही. जेव्हा जनमत त्यांच्या विरोधात जाते, सोशल मिडीयावर जनता आवाज उठवते तेव्हा ते बोलतात छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत, आमचे हिरो आहेत, जर त्यांचा अवमान झाला असेल तर कोणालाही माफ केल्या जाणार नाही अशा पद्धतीने वेळ घालवू उत्तर देतात.

परंतू आपण जर विचार केला तर सावरकर यांच्या बद्दल आक्रमक होणारे माजी मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांबद्दल आक्रमक का होत नसतील? मी छत्रपती शिवराय अशी टोपी का घालत नसतील? छत्रपती शिवरायांचा विषय विधानसभेत का मांडत नसतील? छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या लोकांना पक्षात का ठेवत असतील? छत्रपती शिवरायां बद्दल अपशब्द बोलणाऱ्या लोकांची पाठराखण का करत असतील? याचा अर्थ हा उघड जातीवाद नाही का? स्वतः च्या जातीच्या सावरकरांविषयी सत्य बोलले तरी आक्रमक व्हायचे आणि छत्रपती शिवरायांना चुकीचे जरी बोलले तरी शांत बसायचे याला काय म्हणायचे? सावरकरांचा अवमान झाला की चिड येणाऱ्या लोकांना जर छत्रपती शिवरायांचा जाणीव पुर्वक केलेल्या अवमाच्या वेळी चिड येत नसेल तर काय म्हणावे? आणि मिडिया सुद्धां सावरकर यांच्या विषयी काही कोणी बोलले तर जास्त कव्हरेज करते आणि छत्रपती शिवराय प्रकरणात दूर्लक्ष करते हा उघड जातीवादच नाही तर काय आहे?

तिसरे सर्वात महत्त्वाचे उदाहरण, म्हणजे भारत धर्मनिरपेक्ष आहे, मत मागताना हिंदू म्हणून का माघितले जातात? धर्मनिरपेक्ष देशात जर धर्माचा आधार घेऊन मत मागुन सरकार बनवले जात असेल तर हा देशद्रोह नाही तर काय आहे? भारतीय म्हणून मत कोणी मागत नाही, जातीधर्माच्या नावाखाली मत मागुन सरकार बनवले जाते. बर जे लोक निवडणुकी मध्ये स्वतः ला कट्टर हिंदुत्ववादी समजतात त्यांचे हिंदुत्व नेमके आहे तरी काय हे अजूनही कोणताही भारतीय लोकांना कळाले नाही. मत मागण्यासाठी हिंदु शब्दाचा वापर करायचा अठरा पगडजातीचे मत घ्यायचे सरकार स्थापन करायचे आणि एखाद्या समुहावर व्यक्तीवर अन्याय अत्याचार झाला तर हिंदु वर अत्याचार झाला अस कधीच बोलले जात नाही जसे जातीय द्वेषातून एखाद्या गावामध्ये दोन समुहामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यामध्ये जर आपण संविधानाने दिलेली जी ओळख आहे त्यानुसार विचार केला तर आपल्या लक्षात येते की एस सी समुदायावर अन्याय झाला तर दलितांवर अन्याय, एस टी समुहावर झाला तर आदीवासींवर अन्याय अशा प्रकारची मत मांडून प्रकरणे दाखवली जातात, मताच्या वेळी हिंदू असलेले अन्याय अत्याचाराच्या वेळी दलीत आदिवासी होतात.

हिंदुत्वाचा पोट तिडकिने प्रचार करणाऱ्या लोकांना वर जेव्हा वैयक्तिक आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा मी ब्राह्मण असल्याने मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहेत असे बोलले जाते. कधी कधी कोणाला ब्राह्मण असल्याचा अभिमान असतो. मग ज्यांना ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे ते ब्राम्हणासाठी नाही पण हिंदुत्वासाठी का लढत असतील याचे उत्तर अनुत्तरितच आहे. अन्याय अत्याचार च्या वेळी दलित, आदिवासी, ब्राह्मण असणारे लोक फक्त राजकीय सभा, निवडणूक असेल तेव्हाच हिंदु कसे होतात हा संशोधनाचा विषय आहे. हिंदु आणि हिंदुत्व हा धर्माचा विषय असायला पाहिजे पण धार्मिक पातळीवर बघितलं तर हिंदु हा धर्माचा नाही तर फक्त राजकारणाचा विषय आहे. थोडक्यात काय तर राजकारणात हिंदुत्व आणायचे आणि अन्याय अत्याचारा वेळी जात काढायची याला उघड जातीवाद नाही तर काय म्हणावे? आणि ज्या ज्या वेळी सत्तेच्या खुर्चा जाण्याची भिती निर्माण होते तेव्हाच मात्र हिंदू धर्म धोक्यात येतो. नाहीतर सर्व काही आलबेल असते.

इंद्राचे मिशन सक्सेस! विश्वामित्राचे मिशन फेल!

रोजगार, शिक्षण, आरोग्य मुलभुत सुविधा ह्या लोकांना मिळत नाहीत तेव्हा हिंदु राष्ट्र बनवणारे लोक हिंदु लोक अडचणी मध्ये आहेत, हिंदु तरुणांना रोजगार नाही, हिंदु तरुणांना शिक्षण, आरोग्य, मुलभूत सुविधा मिळत नाहीत असे कधीच बोलत नाही. कारण हिंदू फक्त राजकारणात वापरला जाणारा शब्द आहे. बाकी सर्वत्र उघड जातीवाद आहे. राजकारणाच्या उघड जातीवादाचे अनेक उदाहरणे आहेत. परंतु भारतीय सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांनी राजकीय जातीवादाला न भुलता आपण दैनंदिन जिवन जगताना आपल्याला कोणत्याही भेदभावाची जाणीव होत असेच जिवन जगले आणि राजकारण करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारले तर राजकीय जातीवाद संपुष्टात येईल. भारतीय नागरिक जर राजकीय सभेला, राजकीय नेत्यांना आणि मिडिया च्या मतावर विश्वास ठेवून लागले तर राजकारणातील जातीवाद कायम राहील.
*************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगांव,ता.मेहकर)मो:-९१३०९७९३००
*************************************

आरती श्री संविधान जी की …

चिमुकली श्रद्धाचा मृतदेह सापडला जळलेल्या अवस्थेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here