Home चंद्रपूर रॉयल्स युवा मंच अर्हेर-नवरगाव तर्फे महात्मा फुले स्मृतिदिन कार्यक्रम साजरा

रॉयल्स युवा मंच अर्हेर-नवरगाव तर्फे महात्मा फुले स्मृतिदिन कार्यक्रम साजरा

369

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29 नोव्हेंबर):-रॉयल्स युवा मंच अर्हेर-नवरगाव यांच्या तर्फे सोमवार दि. 28 रोजी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम अर्हेर-नवरगाव महात्मा फुले चौक येथे साजरा करण्यात आला, प्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन मदनकर यांनी केले, यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक मा. सौ. दिपालीताई रविभाऊ मेश्राम (माजी सदस्य जि. प. चंद्रपूर)यांनी महात्मा फुले यांच्या जिवनातील घडलेल्या घटना कथन केल्या.

महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाच औचित्य साधून सामन्य ज्ञानजोती स्पर्धा ठेवण्यात आली होती त्यातील प्रथम , द्वितीय, तृतीय पटकावलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि महात्म्यांच्या जीवनावरील पुस्तके बक्षिस स्वरूपात देण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक शिक्षक रुपेश पुरी महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव, शिक्षक सुरेश मेश्राम विकास विद्यालय अ. न., शिक्षक घनश्याम मेश्राम विकास विद्यालय अर्हेर-नवरगाव यांनी फुले यांच्या जीवनावर विचार मांडले.

या कार्यक्रमास कार्यक्रमाचे सहउद्घाटक दामिनीताई जागेश्वर चौधरी सरपंच अर्हेर-नवरगाव , कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासजी उरकुडे माजी उपसभापती पं. स. ब्रम्हपुरी, उपाध्यक्ष रविभाऊ मेश्राम माजी सभापती पं. स. ब्रम्हपुरी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत पिलारे सदस्य ग्रा.पं. अ. न., शरद भागडकर उपसरपंच भालेश्वर , धीरज जांभुळकर अ. न. , विलास ठेंगरे संजय ठेंगरे सदस्य ग्रा.पं. अ. न. तसेच समाजातील सर्व स्त्री- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जमिनीच्या वादातून काकाला मारलेल्या त्या आरोपीचा प्रताप; पोलिसांच्या वाहनाचा घडवून आणला अपघात, 7 गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here