Home पुणे पदमश्री महाकवी दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे-कवी...

पदमश्री महाकवी दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे-कवी वादळकार

175

🔹दलित पॅंथर चा मुख्यमंञी श्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा व जाहीर प्रवेश

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.27नोव्हेंबर):- स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी कराड येथे महाराष्टाचे मुख्यमंञी श्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त दलित पॅंथर ने श्री एकनाथ शिंदे गटाला पाठींबा देत जाहीर प्रवेश केला.या कार्यक्रमाचे मार्गदर्शन दलित पॅंथर महाराष्टप्रदेशाध्यक्ष पॅंथर सुखदेव तात्या सोनवणे यांनी केले होते.त्यांच्या आवाहानानुसार हजारों कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.पुणे येथुन अनेक वाहानांने कराडला जाऊन तेथे पॅंथर यांनी सहभाग घेतला.

याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.राज्य उत्पादन शुल्क मंञी शंभुराज देसाई,उद्योगमंञी उदय सामंत,आमदार महेश शिंदे,आमदार शहाजीबापू पाटील,पॅंथर सुखदेव तात्या सोनवणे,प्रा.राजेंद्र सोनवणे,शुभम सोनवणे,प्रकाश साळवे,राजेश गायगवळी,इ.मान्यवर यावेळी उपस्थित होते.तसेच कवी वादळकार यांची कवी साहित्यिक विधानपरिषद पदी आमदार म्हणुन निवड व्हावी.यासाठी काही पुणे शहरातुन अनेक कवी साहित्यिक ही उपस्थित होते.कवी वादळकार यांच्या निवडीसाठी पाठपुरावा होण्यासाठी पञ देण्यात आले.यावेळी प्रा.दीलीप गोरे,प्रा.शंकर घोरपडे,पियुष काळे,साहेबराव तायडे,सौ.रुपाली भालेराव,अमोल देशपांडे,रामचंद्र पंडीत,अरुण थोरात,विजय शिंदे,आनंद देशपांडे,अश्विनी देशपांडे,इ.सहभाग घेतला.

यावेळी प्रा.राजेंद्र सोनवणे म्हणाले की,”स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी कराड येथे अतिशय माझ्या आयुष्यातील सुर्वणक्षणांनी कोरुन ठेवणारा दिवस ठरला.कारण स्व.यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन होता.त्यामुळे कराड येथे प्रीतीसंगमी त्याच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी भेट दिली.कारण ही तसेच होते .महाराष्टाचे सर्वांच्या मनातील कार्यक्षम मुख्यमंञी श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दलित पॅंथरने पाठिंबा दिला.तेथे दलित पॅंथरचे अध्यक्ष श्री सुखदेव सोनवणे यांनी सर्व हजारों कार्यकर्त्यासह मुख्यमंञी श्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत काम करण्यासाठी त्यांच्या सोबत प्रवेश केला.त्या प्रसंगी प्रा.राजेंद्र सोनवणे (कवी वादळकार)-संस्थापक राष्टीय अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच यांनी विधानपरिषद मध्ये कवी साहित्यिक आमदार पदी निवड होण्यासाठी पाठपुरावा व्हावा.म्हणुन निवेदन दिले.

याप्रसंगी कवी वादळकार म्हणाले,”स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्टाचे मुख्यमंञी झाल्याझाल्या महाकवी नामदेव ढसाळ यांनी आमदार करण्याची शिफारस केली.तसे पॅंथर नामदेव ढसाळ यांना कळविले सुध्दा.पण अचानक दिल्लीला जावे लागल्यामुळे त्यावेळीच्या एक मोठ्या नेत्याने माञ मग पॅंथर नामदेव ढसाळ हे कसे आमदार होणार नाही.अशी जाणीवपूर्वक काळजी घेतली.त्यामुळे आमदार ते त्यावेळी त्या नेत्यामुळे होऊ शकले नाही. महाकवी पॅंथरचे ते स्वप्न मला पूर्ण करायचे आहे.मी त्यांचे कवी साहित्यिक आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.त्यासाठी दलित पॅंथर च्या वतीने ही कवी वादळकार यांना पाठिंबा ही दर्शविला आहे.नुकताच कराड येथे झालेल्या भव्य सत्कार सोहळ्यात दलित पॅंथरने मुख्यमंञी श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थित प्रवेश केला.आणि महाकवी नामदेव ढसाळ यांच्या स्वप्नांना धुमारा फुटला आहे.ज्या स्व.यशवंतराव चव्हाणांनी पॅंथर नामदेव ढसाळ यांना कवी साहित्यिक आमदार करायचे होते.त्यांच्या स्मृतीदिनी व स्मृतीस्थळी हा योग जुळून यावा.हेच यशाचे संकेत आहेत.

कवी वादळकार गेली २३ वर्ष संपुर्ण महाराष्टातील तळा गाळातील,खेडोपाडी वाडीवस्तीतील ,तळागाळातील कवी कवयिञी,साहित्यिकांसाठी हक्काचे,सन्मानाचे व्यासपीठ मिळण्यासाठी अहोराञ कार्य करत आहे.त्यांच्या विधानपरिषद पदी कवी साहित्यिक आमदार पदी निवड होण्यासाठी संपुर्ण महाराष्टातून शेकडोच्या शेकडो पञे मुख्यमंञ्यांना शिफारस पञ पाठविण्यात यापुर्वीच आलेली आहेत.लवकरच स्व.यशवंत चव्हाणाचे अपुर्ण राहीलेले स्वप्न आणि महाकवी नामदेव ढसाळ यांच्या स्वप्नाची पूर्ती होण्यासाठी कवी वादळकार,पुणे यांना विधानपरिषद पदी कवी साहित्यिक आमदार निवड व्हावी.प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे उर्फे कवी वादळकार हे पॅंथर नामदेव ढसाळ यांचे रक्तांच्या नात्यातील आहेत.पॅंथरचे ते पदाधिकारी आहेत.अनेक वर्षांपासुन दलित पॅंथरचे कार्य करत आहे. पॅंथर नामदेव ढसाळ हे कवी वादळकार यांच्या आईचे मामा आहेत.”

पॅंथर सुखदेव सोनवणे म्हणाले की,”पॅंथर ही मुख्यमंञी श्री एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करुन त्यांच्या कार्याला पुढे घेऊन जाणार आहे.सामाजिक न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.समाजाचा विकास हेच आमचे ध्येय ठेवलेले आहे.

याप्रसंगी मुख्यमंञी श्री एकनाथ शिंदे म्हणाले की,” दलित पॅंथरचे काम मी जवळून पाहीलेले आहे.स्व.पदमश्री नामदेव ढसाळ यांचा माझा चांगला स्नेह होता.दलित पॅंथरला पन्नास वर्ष होत आहे.पॅंथरच्या कार्यकर्त्याला मी विश्वास देतो की भविष्यातील अनेक उपक्रमांना माझ्या सरकारची साथ राहील.”यावेळी पुणेमधुन कराड येथे गेलेल्या कवी साहित्यिकांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगम स्मृतीस्थळाला भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here