Home महाराष्ट्र भारतीय संविधानाने जनतेला एका सुत्रात बांधण्याचे काम केले – संजय गजपुरे

भारतीय संविधानाने जनतेला एका सुत्रात बांधण्याचे काम केले – संजय गजपुरे

137

🔸राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालया, नागभीड येथे संविधान दिवस साजरा

✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागभीड(दि.27नोव्हेंबर);-राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय , नागभीड येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. आनंद घुटके होते आणि प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य व चंद्रपूर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांची उपस्थिती होती.
डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने २६ नोव्हेंबर १९४९ ला देशाला अर्पण केलेले भारतीय संविधान आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी संजय गजपुरे यांनी केले व वेगवेगळे धर्म, जाती , पंथ , श्रीमंत व गरीब , पुरुष व स्री यांना एका सुत्रात बांधण्याचे कार्य संविधानाने केल्याचे सांगितले व भारतीय संविधान म्हणजे भारतीय जनतेला लाभलेली अभुतपुर्व गुरुकिल्ली आहे ज्यामुळे प्रत्येक नागरिकांतील विषमता नष्ट होऊ शकते असे सांगितले . अत्यंत दुरदर्शिपणाने तयार केलेले भारतीय संविधान हे लवचिक असुन मुळ गाभ्याला हात न लावता काळानुरुप त्यात दुरुस्ती होत असल्याचे सांगुन संविधान बदलणार असल्याची काहींची भिती अनाठायी असल्याचे संजय गजपुरे यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅड. आनंद घुटके यांनी संविधान आपल्या जीवनाचा एक अंग आहे आणि त्याचा योग्य तो उपयोग दैनंदिन जीवनात अतिशय लाभदायक आहे असे सविस्तर स्पष्ट करीत संविधानाच्या विविध कलमांची उदाहरणे देत संविधान कर्तव्याची जाणीव करुन देत असल्याचे सांगितले. केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी प्रत्येकानी संविधानाचे महत्व लक्षात घेऊन आपले जीवन सुदृढ करायला पाहिजे तसेच सर्व विद्यार्थांनी कार्यक्रमात मान्यवरचे बोलणे डायरीत नोट करून जीवनात यश संपादन करावे असे विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

या संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले आणि नवीन मतदार नोंदणी करण्यात आली व जनजागृतीसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॅा.प्रा.राजेन्द्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे संचालन प्रा. ढोक यांनी केले तर आभार. प्रा. कुसुमताई चौधरी यांनी मानले . संविधान दिन निमित्याने महाविद्यालयातील विद्यार्थी, समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here