Home महाराष्ट्र गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे संविधान दिन साजरा

गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे संविधान दिन साजरा

204

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 26 नोव्हेंबर):-26 नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय लोकांसाठी खूप खास आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व कळावे, संविधानाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य लालाजी मैंद उपस्थित होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ब्रम्हपुरी येथील सामाजिक कार्यकर्त्या हिना रामटेके, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. संतोष पिलारे, प्रा. सुप्रिया तलमले, जयगोपाल चोले, प्रा. तृप्ती नागदेवते, प्रा. डिंपल तलमले प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून उपस्थित हिना रामटेके यांनी आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे असे त्यांनीं यावेळी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. संतोष पिलारे म्हणाले की, देशावर 150 राज्य करुन ब्रिटीश राजवट मावळत होती. अशावेळी देशात राहणाऱ्या सर्व धर्मीयांमध्ये एकता, समानता टिकवून ठेवेल अशा संविधानाची भारताला गरज होती.

देश एकसंध व्हावा आणि जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व हक्क मिळावेत या प्रेरणेने या भारतीय संविधानाची निर्मिती झाली. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य लालाजी मैंद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना अभ्यास करा व शिस्तीचे पालन करा असे आवाहन केले.

यावेळी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संविधान उद्दिश्यकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्मिता पिलारे यांनी केले. संचालन रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश ठाकरे तर आभार रासेयो विद्यार्थिनी प्रतिनिधी सेजल भागडकर हिने मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here