Home महाराष्ट्र श्री‌ संत‌ सावता‌ माळी‌ क्रिकेट‌ क्लब‌ लासुर‌च्या वतीने पारितोषिक वितरण संपन्न

श्री‌ संत‌ सावता‌ माळी‌ क्रिकेट‌ क्लब‌ लासुर‌च्या वतीने पारितोषिक वितरण संपन्न

77

✒️चोपडा‌(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.16नोव्हेंबर):- श्री‌ संत‌ सावता‌ माळी‌ क्रिकेट‌ क्लब‌ लासुर‌ यांच्या‌ तर्फे‌ भव्य‌ प्लॅस्टिक‌ बाॅल‌ क्रिकेट‌ स्पर्धेचे‌ आयोजन‌ करण्यात‌ आले‌ असून‌ स्पर्धेत‌ प्रथम‌ पारीतोषिक‌ सुनिल‌ पाटील‌ माजी‌ जिल्हा‌ध्यक्ष‌ राष्ट्रवादी‌ युवक‌ कॉंंग्रेस‌ यांचे. तर्फे‌ 10,000‌ रुपयाचे‌ बक्षिस‌ ठेवण्यात‌ आले‌ असून‌ द्वितीय‌ पारीतोषिक‌ 7,000‌ रुपये‌ एम‌.व्ही‌ पाटील‌ सर‌ ,माजी‌ उपसभापती‌ पं‌.स.चोपडा‌ यांचेकडून‌ असून‌ तृतीय‌ पारीतोषिक‌ 5,000‌ रुपये‌ देविलाल‌ बाविस्कर‌ सर‌ माजी‌ सरपंच‌ लासुर‌ ग्रा‌.पं‌ यांचेकडून‌ देण्यात‌ आले, असून‌ वैयक्तिक‌ बक्षिसे‌ ही‌ मान्यवरांकडून‌ देण्यात‌ आलेली होती.तसेच‌ क्रिकेटचे‌ साहीत्य‌ व‌ टी‌ शर्ट‌ चोपड्याचे‌ माजी‌ उपनगराध्यक्ष‌ विकास‌ पाटील‌ यांनी‌ दिले‌ होते.

स्पर्धेचे‌ बक्षीस वितरण कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सुनील पाटील,लासुर उपसरपंच अनिल वाघ सर, माळी समाजाचे माजी अध्यक्ष शंकर माळी, मराठा समाजाचे माजी अध्यक्ष उपेंद्र पाटील, माजी उपसरपंच कैलास बाविस्कर, संत सावता महाजन पतसंस्थेचे चेअरमन आर एन पवार सर, व्हा चेअरमन जितेंद्र महाजन, वि का सह सोसायटीचे चेअरमन सुरेश माळी, माजी चेअरमन एन टी माळी, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन गोकुळ माळी, गोपाल पाटील आदी मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.

सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक चोपडा येथील साई अकॅडमी यांनी तर द्वितीय पारितोषिक लासुर येथील संत सावता क्रिकेट क्लब तसेच तृतीय पारितोषिक चोपडा येथील सुंदरगढी क्रिकेट क्लब ने पटकाविले तसेच मॅन ऑफ दि मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटमॅन, बेस्ट फिल्डर, बेस्ट किपर, मॅन ऑफ दि सिरीज, बेस्ट कॅच, हट्रिक असे विविध वैयक्तिक बक्षीस ही मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र‌ महाजन‌ यांनी‌ केले‌ तर‌ आभार‌ सागर‌ मगरे‌ यांनी‌ मानले‌ स्पर्धेचा‌ यशस्वीतेसाठी‌ प्रेमराज‌ शेलकर‌,‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌हर्षल‌‌‌ महाजन,साहेबराव‌ मगरे,पंकज महाजन, महेश‌ महाजन, रविंद्र‌ मगरे‌, राहुल मगरे, निलेश साळुंखे, बंटी धोबी, आदी क्रिकेट क्लब च्या खेळाडूंनी परीश्रम‌ घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here