Home महाराष्ट्र उपजिल्हा रूग्नालयात प्रस्तुती करिता आलेल्या महीलेना एक हजार रुपये मोजावे लागतात

उपजिल्हा रूग्नालयात प्रस्तुती करिता आलेल्या महीलेना एक हजार रुपये मोजावे लागतात

131

🔸तेरी बी चुप मेरी बी चुप हा सावळा गोधंळ सुरूच

🔹पैसे नाहीं दिलेतर प्रस्तुती महीलेला उपचाराकरीता जावे लागते खाजगी दवाखाण्यात

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16नोव्हेंबर):-उपजिल्हा रूग्नालयात कार्यर्रत असलेले कर्मचारी नर्स सर्रास प्रस्तुतीसाठी आलेल्या गोरगरीब महीलेची व त्यांच्या नातेवाईकाची दिशाभुल करून पिळवणुक केल्या जात आहे.दिनांक 13 व14 या तारखेला उपजिल्हा रूग्नालय येथे भेट दिली असता प्रत्येकी महीले कडुन एक हजार ते नऊशे रूपये घेतल्या शिवाय कोणत्याही महीलेची डीलेवारी केली गेली नाहीं आणी पैसे दिले हे कोणत्याही व्यक्तीला सांगु नये असे प्रस्तुतीसाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना दमदाटी करीत असतात कारण आम्हीतर फक्त एकच हजार रूपयात डिलेवारी करतो आणी ते पण काळजी पुर्वक हेच जर तुम्हाला खाजगी दवांखाण्यात गेले तर तिथे केसासारखे 25 ते 30 हजार रूपये मोजावे लागतात अशा प्रकारची भाषा बोलल्या जाते.

वास्तविक पहाता हा बऱ्याच दिवसापासुन उपजिल्हा रूग्नालयात असा प्रकार सुरु आहे याकडे कुठल्याही आधिकाऱ्याचे लक्षच नाही त्यामुळे हा सावळा गोधंळ कुठेना कुठे थांबावा अशी मागणी होत आहे.दुसरी महत्वाची बाब म्हणजे जन्मनोदीचा एक कागदाला 150 रू देखील घेतल्या जातात.

वास्तविक पहाता शासणाच्या निकषात कुठे असी तरतुद नसतांना देखील नियमा बाह्य हा प्रकार चालतोय कसा…! या सर्व बाबीस जबाबदार कोण असावा कारण शासनानी ज्या काही मुबलक सुखसुविधा प्रस्तुती महीलेकरिता शासणानी निकषानुसार दिल्या गेल्यात त्या निकषानुसार एक हि सुखसुविधा दिल्या जात नाहींत प्रस्तुती महीलेच्या खाटे जवळ आणी तेथील पुर्ण यार्ड मध्ये ज्या प्रकारे स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावयास पाहीजे तसे कुठलेही साम्रगी साधन आढळुन येत नाहीं आणी आजुबाजुचा परिसर सुद्धा स्वच्छता नाही पुर्ण पणे घानीचे साम्राज्य पहावयास दिसुन मिळेल या आशा परिस्थीत वेळोवेळी प्रत्येक दिवशी दिन जाओ पैशा आयो अशी गत पुसद उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचारी गोरगरीबांच्या जिवणाशी खेळ खेळत आहेत.

या सर्व बाबीकडे वरिष्ठांनी तात्काळ जातीने व काळजी पुर्वक लक्ष द्यावे आणी हा होत असलेला भोंगळा कारोभार कुठेतरी आळा घालुन थांबविण्यात यावा अन्यथा मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष बळवंत मनवर यांना आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देखील दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here