Home महाराष्ट्र सिरसदेवी गावात जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करा – शाम अडागळे

सिरसदेवी गावात जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करा – शाम अडागळे

99

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.16नोव्हेंबर):-तालुक्यातील सिरसदेवी गावात जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली तर खड्यामुळे या रस्त्याची अक्षरश: हा चाळणी झाली आहे. यापूर्वी अनेकदा या रस्त्यासंदर्भात बातम्या प्रसारित झाल्या तरीही सर्वाजनिक बांधकाम विभागाला जाग येत नाही.तुम्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला हा रस्ता करता येत नसेल तर या रस्त्यावरून लोक जाऊ नये यासाठी या रस्त्याला कुंपण तरी घालावे नाहीतर रस्ता तरी दुरुस्त करा अशी मागणी पत्रकार शाम अडागळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

गेली अनेक महिन्यापासून या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत मागील काही दिवसापूर्वी खड्डा चूकवताना टू व्हीलरचा अपघात झाला होता या अपघातात गावातील दोन युवकांना पायाला, हाताला, डोक्याला मार लागला होता.अजूनही या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तसेच सिरसदेवी गावातून एखाधा गंभीर पेशंट असेल तर त्याला याच रस्त्यावरून गेवराई रुग्णालयात घेऊन जावे लागते मात्र खराब रस्ता व मोठ मोठी खड्डे असल्यामुळे एखाद्या पेशंटचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कोणाचेही आयुष्य धोक्यात येऊ नये म्हणून रस्त्याची दुरस्ती तात्काळ करावी अशी मागणी अडागळे यांनी केली आहे.तसेच या रस्त्याच्या आजूबाजूने शेतकरी अतिक्रमण मोठया प्रमाणात करत आहेत .

यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावरून दोन वाहने समोरासमोर आली तर पास होत नाहीत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 61 ला जोडणारा असून हा सिरसदेवी गावातून तलवाडा येथे जातो गावात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना विविध समस्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी पत्रकार शाम अडागळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here