Home महाराष्ट्र सुधीरभाऊंच्या सेवाभावी विचारांचे व्यासपीठ म्हणजे घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र...

सुधीरभाऊंच्या सेवाभावी विचारांचे व्यासपीठ म्हणजे घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र ! – सर्वाधिकारी लक्ष्मनराव गमे

131

🔸गुरुकुंज आश्रमाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव गमे यांची ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला सदिच्छा भेट

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.1जानेवारी):- अमरावती येथील गुरुकुंज आश्रमाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव गमे यांनी शुक्रवार ३० डिसेंबर रोजी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्य घुग्घुस शहरात आले होते.

याप्रसंगी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे संचालक विवेक बोढे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती त्यांना सांगितली.

यावेळी गुरुकुंज आश्रमाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव गमे म्हणाले
मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र म्हणजे मानवसेवेचे अविश्रांत केंद्र आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहे.
या केंद्रातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येते हे मी पहिल्यांदाच बघितले आहे. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. येथे काम करणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो व ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राची दिवसेंदिवस प्रगती व्हावी हिच गुरुदेव चरणी प्रार्थना करतो.

यावेळी गुरुदेव उपासक विनोद मालू, पुरुषोत्तम भोयर, प्रेमलाल पारधी, संजय भोंगळे, सिनू इसारप, कोमल ठाकरे, नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम, भारती परते, स्वाती गंगाधरे व सेवा केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here