Home महाराष्ट्र भगवतीदेवी विद्यालयात ‘चालता बोलता’

भगवतीदेवी विद्यालयात ‘चालता बोलता’

123

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.1जानेवारी):-भगवतीदेवी विद्यालय, देवसरी येथे निसर्गरम्य भव्य प्रांगणात राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान संविधानाची पाच कलमे आणि कवायत परिपाठानंतर चालता बोलताच्या दहाव्या पुष्पाला सुरुवात झाली. अतिशय मजेदार तथा बौद्धिक कार्यक्रमाची विद्यार्थीवर्ग आवडीने शनिवारची वाट पाहणा-या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रथम विजेती कु. विद्या शिंदे वर्ग सातवा द्वितीय विजेती कु. निकिता कदम वर्ग दहावा तर तृतीय विजेती कु. मयूरी डांगे यावेळेस बक्षीसाचे आयोजक सौ. मीनाताई कदम यांनी दोन लेखन वह्या रंगीत पेन्सिलचा बॉक्स यांनी दिला.

यावेळेस मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे यांनी सरत्या वर्षाला निरोप देताना वाईट गुण सोडा चांगल्या गुणाची संगत धरा नवीन वर्षाचे नवे नवे संकल्प करा अभ्यासाशी एकनिष्ठव्हा भ्रमणध्वनीचा वापर कमी करा भावी जीवन खूप चांगले आहे. त्यासाठी स्पर्धात्मक अभ्यासाची गरज आहे. अशा विविध विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे संचलन अनिल अल्लडवार यांनी बहारदार आवाजात केले. यावेळेस विद्यालयातील कर्मचारी दिगंबर माने शेख सत्तार गणेशराव शिंदे राजेश सुरोशे भागवत कबले मारोती महाराज अरविंद चेपुरवार भागवत जाधव तर एक छोटीशी चिमुकली कु. क्षितीजा दिगंबर कदम कारखेड हिने सुंदर अशी प्रार्थना गाऊन दाखवली तिचे सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. 2022 वर्षातील शेवटचा चालता बोलता हा कार्यक्रम ठरला गेला असे म्हणायला हरकत नाही पुढच्या चालता बोलताचे बक्षीसाचे आयोजक भागवत जाधव पाटील यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here