Home महाराष्ट्र दस्केबर्डी गावात एका आठवड्यात तीन सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक...

दस्केबर्डी गावात एका आठवड्यात तीन सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांची संस्कृती गावा – गावात रुजवणार – भगवान बोरसे ( सत्यशोधक विधीकर्ते )

284

 

प्रतिनिधी –

चाळीसगांव – दस्केबर्डी तालुका चाळीसगाव येथे सत्यशोधक संघाच्या कार्याला जबरदस्त गती दस्केबर्डी येथील विधीकर्ते सत्यशोधक भगवान बारीकराव बोरसे यांच्या माध्यमातून त्यांच्या गावात एका आठवड्यात तब्बल तीन विवाह सार्वजनिक सत्यधर्म सत्यशोधक पद्धतीने पार पडले.
क्रांतीची सुरुवात ही आपल्यापासून करायला हवी याप्रमाणे पहिला विवाह सत्यशोधक विधीकर्ते भगवान बोरसे यांच्या सुकन्याचा दिनांक 26 /4 /2024 रोजी पार पडला , दुसरा विवाह कै.विक्रम धना अहिरे यांच्या मुलाचा दिनांक 1/5/2024 रोजी पार पडला आणि लगेच तिसरा विवाह संजय विठ्ठल बोरसे यांच्या मुलाचा दिनांक 2 /5/2024 विवाह मोठ्या उत्साहात पार पडला.
आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाज सुधारक, शिक्षणतज्ञ, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य, महात्मा जोतीराव फुले यांनी लावून दिलेल्या नियमाप्रमाणे व सांगितलेल्या विधीप्रमाणे विवाह अती उत्सवात आणि बहुसंख्य यांच्या उपस्थितीत पार पडले या विवाहासाठी सत्यशोधक विधीकर्ते भगवानजी रोकडे ( पातोंडा ) भगवान बोरसे सर ( दस्केबर्डी )आणि विलास माळी ( पातोंडा ) यांच्या मार्गदर्शनाने पार पडले. सत्यशोधक समाज संघाच्या कार्याला, शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांना दस्केबर्डी मधून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
गावातून या तिन्ही कुटुंबाच्या क्रांतिकारी निर्णयाचं स्वागत व कौतुक होत आहे आणि यापुढे गावात सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने लावणार असे प्रतिपादन सत्यशोधक विधीकर्ते भगवान बोरसे सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here