Home चंद्रपूर ग्राम वाचनालय अर्हेरनवरगाव येथे संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

ग्राम वाचनालय अर्हेरनवरगाव येथे संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

25

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:-ग्राम वाचनालय अर्हेरनवरगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष गौतमजी खोब्रागडे, उपाध्यक्ष प्रा. रोशन मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक अमरदिपजी लोखंडे आणि प्रमुख पाहुणे संगीताताई मेश्राम , खोब्रागडे मॅडम व मधुसुधनजी कांबळे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याबद्दल व जीवनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ग्राम वाचनालय अर्हेरनवरगाव येथील सर्व अभ्यासक विद्यार्थी व विद्यार्थिनी व ग्राम वाचनालय नियोजन समिती अर्हेरनवरगाव चे सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here