Home चंद्रपूर मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद

20

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भात जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू असून 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) चे कलम 37 (1)(3) अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच कलम 144 अन्वये मतदानाच्या कालावधीत विविध बाबींवर प्रतिबंध लागू करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार असल्यास, बाजारात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दीमुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आठवडी बाजारामुळे मतदानाच्या टक्केवारीवर सुध्दा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शुक्रवार दि. 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाच्या दिवशी भरणारे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here