Home चंद्रपूर ट्रॅक्टर ची ट्रॉली पलटी मारल्याने दोन महिलांचा मृत्यू तर अनेक जण जखमी...

ट्रॅक्टर ची ट्रॉली पलटी मारल्याने दोन महिलांचा मृत्यू तर अनेक जण जखमी शिवनपायली येथे नव वधुस ट्रॅक्टर ने आणण्यास गेले असता घडला अपघात

62

 

✍️शार्दूल पचारे

चिमूर : – सिंदेवाही वरून १५ कि.मी. अंतरावरील गुंजेवाही कोटा ईथुन चिमूर नेरी जवळील शिवनपायली याठिकाणी नवं वधू ला आणण्यासाठी गावकरी ट्रॅक्टर ने गेले असता अगदी शिवनपायली जवळच ट्रॅक्टर चा हायड्रोलीक दबल्याने ट्रॅक्टर ची ट्रॉली वर झाली व ट्रॉली पलटी मारल्याने अंदाजे ३० ते ३५ जण जखमी झाल्याची घटना घडली.तात्काळ या घटनेची माहिती चिमूर येथील तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना मिळताचक्षणी घटनास्थळी धावघेत चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करीता दाखल करण्यात आले. घटनास्थळी एका २२ वर्षीय मुलीचे निधन झाले तर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान एका ५५ वर्षीय महिलेचे मृत्यू झाले तर अजूनही जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.अशाप्रकारे दोघांचे मृत्यू तर अनेक जण जखमी झाले असून कोटा तसेच शिवनपायली याठिकाणी शोककळा पसरली असून उपजिल्हा रुग्णालय चिमूर याठिकाणी गावकऱ्यांनी धाव घेत बघ्यांची गर्दी जमली आहे.यावेळी रुग्णालयात चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल व त्यांचा पथक दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here