Home महाराष्ट्र भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे — ह भ...

भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे — ह भ प कनेरकर महाराज

30

 

दापोरी प्रतिनिधी /
संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून विविध धर्मग्रंथांनी मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे प्रतिपादन प्रतिपादन गुरुवर्य वाणीभूषण विदर्भ रत्न हरिभक्त पारायण कनेरकरजी महाराज यांनी केले. श्री संत ललदासबाबा यांच्या १०४ व्या पुण्यतीथी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहात ते बोलत होते.
यावेळी कनेरकर महाराज म्हणाले की श्रीमद् भागवत कथा जीवनातली व्यथा समाप्त करणारी आहे भागवत कामधेनू आहे भागवत कल्पवृक्ष भागवत चिंतामणी ज्याच्या मनात भागवत ज्याच्या घरात भागवत ज्याच्या घरात भागवत आणि लालदास स्वामी महाराजांच्या चरण कमलापाशी उभारलेला भागवत मनातली घरातली जरी ती कयमची दूर होते श्रीमद् भागवत कथा आपल्या संसारी माणसाची व्यथा कायमची दूर करते कायमची दूर करते जीवनाचं सोनं करन आपल्या हातात आहे म्हणून या सप्ताहामध्ये येऊन आपल्या जीवनाला सुंदर कलाटणी देऊन आदर्श जीवन जगून आपला संसार सुखाचा कसा होईल हे आजच्या प्रवचनांमध्ये गुरुवर्य वाणीभूषण विदर्भ रत्न हरिभक्त परायण कनेरकर जी महाराजांनी पोट तिडकेने वर्णन करताना सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आणून भागवताची कथा सांगण्याचा प्रयत्न केला.
श्री संत लालदास बाबा यांचा १०४ वा भव्य पुण्यतिथि महोत्सव दापोरी येथे सालाबादा प्रमाने यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होत असून या पुण्यतिथी महोत्सवा निमित्य संगीतमय सदृश्यमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह विदर्भ रत्न प पु गुरुवर्य वाणी भूषण भागवतचार्य ह भ प श्री कनेरकर महाराज यांच्या अमृत तुल्य वानीतून विवीध उपक्रम राबऊन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here