Home चंद्रपूर भाजपा सरकारला उखडून फेका –डॉ नामदेव किरसान

भाजपा सरकारला उखडून फेका –डॉ नामदेव किरसान

56

 

नेरी प्रतिनिधी

कांग्रेस पक्षाने मला महाविकास आघाडीतुन लोकसभेची उमेदवारी दिली आहे ही संधी दिली आहे अशा वेळी संधी दिलेली आहे की यावेळेस परिवर्तनाची गरज येवून ठेपली आहे
ही निवडणुक अटितटीची निवडणूक आहे कारण की ज्या सत्त्तेत मागच्या दहा वर्षांत त्यांचे धोरण जर बघीतले तर अरेराविचे धोरण आहे जे सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने बोलतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा काम किंवा सिबीआय,ईडी ची भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षात सामील करुण घेण्याचे महापाप करीत आहे त्यामुळे अशा महापापी लोकांना सत्तेतून उखडून फेका असे प्रतिपादन डॉ नामदेव किरसान यांनी केले
चिमुर येथे महाविकास आघाडीचे कांग्रेसचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ अविनाश वारजुकर होते , विशेष अतिथी म्हणून विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते वीजय वडेट्टीवार, उमेदवार डॉ नामदेव किरसान, पंजाबराव गावंडे ,डॉ सतिश वारजुकर, अड गोविंदराव भेंडारकर,प्रा राम राऊत सर,संजय भाऊ डोंगरे ,हसनजी गीलानी ,श्रीनिवास शेरकी, रविंद्र पंधरे उपसभापती क्रुषी समीती,सोपान भाऊ खोडके, किशोर शिंगरे ,प्रफुल खापर्डे, प्रशांत कोल्हे,धनराज मुंगले,गजानन बुटके,राजु लोणारे,डॉ कावळे,डॉ बोढे,प्रमोद चौधरी अध्यक्ष नागभीड तालुका कांग्रेस, संजय घुटके माजी तालुका अध्यक्ष ,घनश्याम चाफले,विनोद ढाकुणकर,माधव बीरजे,अविनाश अगडे, नान्हे सर, नागेंद्र चट्टे, धनराज मालके,जावाभाई शेख,विलास पिसे, सिमाताई बुटके,माधुरी रेवतकर,गीतांजली चुटे,लता पिसे,नर्मदा रामटेके, वैशाली शेंडे, भावना ताई पिसे,सविता चौधरी,ईत्यादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
याप्रसंगी महाविकास आघाडी चे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांच्या चिमुर च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते विधीवत पुजेने करण्यात आले
शेतकरी भवनात पार पडलेल्या बुथ अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भव्य मेळाव्यात
उषाताई हिवरकर माजी नगरसेविका, हेमलता नन्नावरे माजी नगरसेविका, दर्शना बतकल,कोमलताई यांनी विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कांग्रेस पक्षात प्रवेश केला विजय भाउंनी पक्षाचा दुप्पट्टा टाकून त्यांचे जोरदार स्वागत केले
यावेळी
मेळाव्याला संबोधित करतांना डॉ किरसान म्हणाले की लोकशाही शोधायला दिसत नाही संवीधानाचे तुकडे तुकडे करण्याचे संकेत दीसुन येत आहे संवीधान जर अस्तित्वात असलं तर त्या संवीधानातील तरतुदी भाजप सरकार मानायला तयार नाहीत आपण जर परिवर्तन घडवून आणले नाही तर येणाऱ्या पिढ्यांना भरपूर त्रास होणार आहे
त्यांच्या शिक्षणाच्या सोयी बंद होणार आहे, होस्टेलच्या सोयी बंद होणार आहे स्कालरशिफ मिळणार नाही
खाजगी विद्यापीठात आरक्षण होत आरक्षणाच्या भरोशावर एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांना एडमिशन व स्कालरशिफ मिळायची पण या सरकारने आता खाजगी विद्यापीठातील आरक्षण सुद्धा बंद करण्याचा नीर्णय घेतला आहे.हे जर टाळायचे असेल तर या भाजप सरकारला या निवडणुकीत उखडून फेकावे लागेल असे मोलाचे मार्ग दर्शन डॉ किरसान यांनी उपस्थित मतदारांना केले

यावेळी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार कडाडले की रशीया सारखी परिस्थिती या देशावर येवू शकते रशीयाने विरोधक संपविले आहे ,बाबासाहेबांच्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी बहुजनांनी हुकशाहाला रोखले पाहिजे मतांचे विभाजन होवू देवु नका सावध व जाग्रुत रहा व भारतीय राष्ट्रीय कांग्रेस महाविकास आघाडीचे उच्चविद्याविभूषित डॉ नामदेव किरसान यांना भरघोष मतांनी विजयी करा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे संचालन विवेक कापसे यांनी केले
प्रास्ताविक विजय गावंडे यांनी केले
आभार विजय डाबरे यांनी मानले
कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महीला पुरुष युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here