Home महाराष्ट्र वाळू डेपोतील लूटमार थांबवा – देवचंद चांदेवार साकोली पत्रपरिषद घेत केला...

वाळू डेपोतील लूटमार थांबवा – देवचंद चांदेवार साकोली पत्रपरिषद घेत केला आरोप अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

60

 

साकोली : तालुक्यातील परसोडी वाळू डेपोतील ठेकेदार शासनाच्या नियमाविरूध्द बोगस पावती देत सामान्य जनतेकडून अतोनात लूटमार करीत आहे. हा संतप्त प्रकार थांबवा अन्यथा साकोली तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषणाचा इशारा देवचंद चांदेवार यांनी शनिवार ०६ एप्रिलला विश्राम गृहात पत्रकार परिषदेत हा गंभीर आरोप व मागणी केली आहे.
सदर प्रेस नोट मागणीत नमूद १) भंडारा जिल्हयात प्रत्येक तालुक्यात शासनाच्या नियमानुसार एक ब्रास वाळू साठी नवे दर परसोडी / मरेघाट साकोली येथे दर १०७३/- रू. प्रमाणे ऑनलाईन बुकींग झाल्यावर परसोडी येथे डेपोवर ट्रान्सपोर्ट वाहन घेऊन गेल्यास डेपो सुपरवायजरला ऑनलाईन पावली दाखविल्यावर त्याप्रमाणे माल देणे अनिवार्य असते. पण डेपो कंत्राटी निखिल झिंगरे माल भरून देत नाही. २) पाच ब्रॉस वाळू भरायची असेल तर मला ६ हजार हजार रु नगदी द्या व ते घेत बोगस पावती देण्यात येते व ट्रैक्टर भरण्यास गेल्यावर ७००/-रु अगोदर द्या, व बिना पावतीने वाळू न्यायची असेल तर एक ट्रकचे प्रती ८, हजार द्या तेव्हाच वाळू माल न्या असा दम देतात. ०३) यात शासनाच्या कुठल्याही आदेशामध्ये १०७३/- हा दर ठरविला असतांना बळजबरीने त्यांच्या कडून पैशे वसुली केल्याशिवाय माल (वाळू) देत नाही. हा सामान्य जनतेशी लूट करण्याचा गोरखधंदा आहे यावर शासनाने तातडीने कारवाई करण्यात यावी. ४) आपण त्यांना विचारणा केल्यास ” मी करोडों रूपये लावले, म्हणून मी पैश घेतो” असे जनतेला उत्तर देतो. पावती दाखविल्यास ही माल देण्याचा अधिकार आहे असे सांगतो. यामध्ये शासकीय धोरणात असा कोणताच प्रकारचे पैसे घेण्याचा नियम नसून सर्रासपण जनतेची लूट चालविली आहे. परत जेवढी वाळू रॉयल्टी घेऊन कोणतीही ऑनलाईन न करता विकली आहे तेवढी ऑनलाईन बुकींगवर विकलेली नाही याची उच्चस्तरीय चौकशी करावी. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी कारण यात सामान्य जनतेची आज आवास – घरकुलची कामे सुरु असुन हा गोरगरीबांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. होणाऱ्या सामान्य जनतेची लुट थांबवावी. ह्यांकडून सांगितले जाते की महसूल तहसील विभागालाही ३ लाख रुपये द्यावे लागत असल्यामुळे आणि हा ठेका घेण्यासाठी आम्ही अतोनात रूपये खर्च केले आहे. असे उत्तर चिचगड येथील निखिल झिंगरे हा सामान्य आणि गोरगरीब जनतेला दमदाटी उत्तर देत असतो. ५) ही होत असलेली गोरगरीब जनता, घरकुल लाभार्थ्यांची होणारी सर्रासपणे होणारी लूट थांबवावी अन्यथा मला तहसिल कार्यालय साकोली समोर आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागेल. अशी माहिती शनिवार ०६ एप्रिल २०२४ घेत असलेल्या पत्रकार परिषदेत लिहून देत आरोप व मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here