Home चंद्रपूर त्या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर डॉ वारजुकर यांच्या पुढाकाराने फुलले स्मितहास्य

त्या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर डॉ वारजुकर यांच्या पुढाकाराने फुलले स्मितहास्य

73

 

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर

चिमूर तहसील कार्यालयात काम न झाल्याने नाराज चेहरा घेऊन त्या वृद्ध महिला बाहेर पडत होत्या परंतु वाटेतच डॉ सतीश वारजुकर यांची भेट झाली आणि त्यांनी त्यांचे कामा तात्काळ केल्याने त्या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे
वृद्धपकाळात सुखी जीवन जगता यावे निराधार लोकांना आधार मिळावा यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आले त्यामुळे बऱ्याच निराधार लोकांना आधार झाला परंतु आता नव्याने पुन्हा या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करावे लागते आणि त्याची प्रत तहसील कार्यालयात द्यावे लागते ऑनलाईन केल्यानंतर हे प्रत देण्यासाठी तहसील कार्यालय येथे त्या वृद्ध महिला गेले असता तेथील संबंधित बाबूंनी हे कागदपत्र घेण्यास नकार दिला वारंवार विनंती करूनही त्या वृद्ध महिलांनची कागदपत्रे घेतली नाही अखेर त्या महिला काम न झाल्यामुळे निरागस चेहरा घेऊन बाहेर निघाल्या परंतु तितक्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ सतीश वारजूकर यांची भेट झाली. त्यांनी आपले समस्या त्यांना सांगितले त्यांनी लगेचच त्या सर्व वृद्ध महिलांना घेऊन संबंधित बाबू कडे गेले आणि संबंधित बाबुला धारेवर धरून अखेर त्या वृद्ध महिलांचे अर्ज घेण्यास बाध्य केले सदर वृद्ध महिलांना न्याय मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आणि वारजूकर यांना आशीर्वाद देऊन ते आपल्या गावाकडे परत गेल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here