Home चंद्रपूर तळोधी बा. वनपरिक्षेत्रात अवैध उत्खननावर वन विभागाची मोठी कारवाई (गिरगाव व लावारी...

तळोधी बा. वनपरिक्षेत्रात अवैध उत्खननावर वन विभागाची मोठी कारवाई (गिरगाव व लावारी येथे तीन जेसीबी व तीन ट्रॅक्टर अवैध उत्खनन व वाहतूक करताना जप्ती.)

45

संजय बागडे9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड:-ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील, गोविंदपुर नियत क्षेत्रात गिरगाव येथील संरक्षीत वनक्षेत्र, कक्ष क्रमांक 535, येथे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधाराने वन विभागाने धाड टाकली व जप्तीची कारवाई केली. यामध्ये गिरगाव ग्रामपंचायत सरपंच्यां द्वारे हे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळेस अंदाजे कमीत कमी 50 ब्रास मुरूम हे अवैधरित्या उत्खनन करून ग्रामपंचायत च्या पांदन रोडवर टाकल्याचे निदर्शनास आले. या कारवाईमध्ये मोक्यावर अवैध उत्खनन करताना दोन(2) जे.सी.बी. मशीन, व अवैध वाहतूक करताना तीन(3) ट्रॅक्टर हे वनविभागाच्या चमुने जप्ती केले.
या जप्ती कारवाईच्या वेळेस तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अधिकारी आरूप कन्नमवार, गोविंदपुर नियत क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड, गिरगावचे वनरक्षक बी.के.तोरले, तळोधी बा.चे वनरक्षक राजेंद्र भरणे , गोविंदपूर, सारंगड चे वनरक्षक पी.एम. श्रीरामे तर येनुली(माल) च्या वनरक्षक के.आर. सिंग यांनी ही कार्यवाही सकाळी १०:३० वाजता केली.
तर दुसरी कारवाई ही नेरी नियत क्षेत्रातील, लोहारा बीटातील लावारी येथील संरक्षित वन , कक्ष क्रमांक 455 येथे करण्यात आली. ही कारवाई सायंकाळी 3:30 वाजता करण्यात आली. यावेळेस मोक्का स्थळी असलेली एक जे.सी.बी. जप्त करून ती वन विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आली. ही कारवाई नेरी येथील क्षेत्र सहाय्यक चंद्रशेखर रासेकर सोबत बोधडा बीटाचे वनरक्षक संभाजी वडजे यांनी केली.
व एकूण तीन (3) जे.सी.बी. व तीन (3) ट्रॅक्टर हे जप्त करण्यात आलेले वाहन हे वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले. अवैध उत्खनन करून त्या क्षेत्रात अतिक्रमण करणे हे काही लोकांचे काम बनलेले आहे. माञ या कारवाईनंतर परिसरातील लोकांनी वन विभागाचे आभार मानत वन विभागाचे या कारवाई बद्दल स्वागतच केले. मात्र कोणताही वाहतूक व उत्खनन चा पूर्वपरवाना व वन विभागाची परवानगी नसताना गिरगाव येथील सरपंचीनी हे अवैध उत्खनन करणे चर्चेचे विषय बनले आहे. पुढील तपास व चौकशी तळोधी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
“कोठ” “मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोक्याच्या स्थळी भेट दिली असता, संरक्षित वन कक्ष क्रमांक 535 मध्ये, अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले व चौकशी केली असता या उत्खननाबाबत कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली निदर्शनास आली नाही. व जागाही संरक्षित वन क्षेत्र असल्यामुळे कारवाई करण्यात आली.
” – आरुप कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी तळोधी (बाळापुर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here