Home चंद्रपूर नागभीड येथील सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थीची ब्रह्माकुमारीजला भेट

नागभीड येथील सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थीची ब्रह्माकुमारीजला भेट

43

 

संजय बागडे 9689865954

*नागभीड तालुका प्रतिनिधी*
नागभीड:-सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या बीए व बीएससी च्या सर्व विद्यार्थिनींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी प्रजापिता ब्रह्माकुमारी‌ ईश्वरीय विश्वविद्यालय नागभीड सेवा केंद्रा मध्ये महाशिवरात्री निमित्त आयोजित बारा ज्योतिर्लिंग झाकी तसेच विश्व नवनिर्माण प्रदर्शनी चे आयोजन केल्या गेले होते ही प्रदर्शनी बघण्यासाठी महाविद्यालयातील सर्वांनी उपस्थिती दर्शविली याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संयोजिका राजयोगिनी ब्रम्हाकुमारी मेघा दीदी जी तसेच ब्रह्माकुमारी वनदेवी दीदी यांनी सर्वांचे तिलक लावून व फुले देऊन स्वागत केले त्यानंतर राज योग मेडिटेशन ची आवश्यकता स्पष्ट करून सांगितले विद्यार्थ्यांना आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव मुक्त राहणे किती गरजेचे आहे याबाबत विस्तृत विवेचन केले तणाव मुक्त राहण्यासाठी प्रथम धराजयोग मेडिटेशन शिकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले ज्यामध्ये आपण कोण? आपली खरी ओळख काय? हे जाणून घेतल्याशिवाय खऱ्या शांतीची अनुभूती होत नाही यासाठी विविध उदाहरणांच्या माध्यमातून अतिशय सोप्या शब्दात सर्वांना शरीर आणि आत्मशक्ती यांचा सुरेख संगम साधून निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह कसे बनवायचे याचा उत्तम राजमार्ग म्हणजे राजयोग मेडिटेशन आहे असे नमूद केले शरीर एक साधन आहे व याला चालवणारी सर्वोच्च शक्ती म्हणजेच आत्मा आहे आत्म्याचे तीन शक्ती आहेत त्या म्हणजे मन ,बुद्धी आणि संस्कार .संस्कारांना श्रेष्ठ करण्यासाठी सर्वप्रथम मनात चांगल्या विचारांची बिजारोपण करणे गरजेचे असून चांगला विचारांची सवय लावल्यास नक्कीच संस्कार चांगले होतील यात वाद नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना रोगमुक्त, तणावमुक्त व उत्तम जीवनशैलीसाठी राजयोग मेडिटेशन एक उत्तम औषध आहे. असे म्हटल्यास वावगे होणार नाही राजयोग मेडिटेशन चा गहन अनुभूतीयुक्त अभ्यास करून दाखवण्यात आला. दहा मिनिटे सर्वच विद्यार्थी राजयोग्याच्या अनुभूतीने स्थिरावले ,शांत झाले व सर्वांनी राज योग मेडिटेशन शिकून घेण्यास तयारीही दर्शविली .अशाप्रकारे सन्माननीय ब्रह्माकुमारी मेघा दीदींनी सर्वांना प्रसाद देऊन ईश्वरीय विद्यालयाला भेट दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले भेट वस्तूही दिल्या. याबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर रेखा जिभकाटे यांनी महाविद्यालयातर्फे सन्माननीय मेघा दीदी व वनदेवी दीदींचे आभार प्रगट केले .याप्रसंगी प्राध्यापक कुंबरे, प्राध्यापिका भाकरे, अभय सूर्यवंशी ,कुमारी ऐश्वर्या तर्वेकर, रुक्मिणी मानापुरे व समस्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here