Home गंगाखेड रायभोळे यांच्या रास्त भाव दुकानातून साड्या व पिशव्यांचे वाटप

रायभोळे यांच्या रास्त भाव दुकानातून साड्या व पिशव्यांचे वाटप

41

 

गंगाखेड : महात्मा फुले नगरातील रास्त भाव दुकानदार प्रवीण तुकाराम रायभोळे यांच्या दुकानातून, अंत्योदय (AAY) शिधापत्रिकाधारकांना साडी व पिशवी आणि अन्नसुरक्षा (PHH) योजनेतील शिधापत्रिकाधारकांना पिशवीचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
म.फुले नगरातील प्रविण रायभोळे यांच्या दुकानाला जवळपास 800 शिधापत्रिका असून, त्यापैकी अंत्योदय 54 शिधापत्रिका आहेत. या 54 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साड्या व पिशव्या तर अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना मोफत पिशव्यांचे वाटप केल्या जात आहेत.
पिशव्या आणि साड्या या अन्नसुरक्षा व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानातून ई-पोस मशीनवर अंगठा देऊन, पडताळणी करून वितरीत केल्या जात आहेत.
शासनाकडून रास्त भाव दुकानांमधून वर्षात दोनदा दहा किलो वजन पेलणाऱ्या पिशव्या मोफत देण्यात येणार आहेत. सध्या या पिशव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या धान्याची माहिती, त्याचे प्रमाण, फ्री रेशन व एकूण खर्चाबाबत जागरूकता इत्यादी माहिती लिहिलेली पिशवी (कॅरीबॅग) रेशन दुकानाद्वारे अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरित करण्यात येत आहे. त्याबरोबरच वर्षात एकदा अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साड्याही वाटप करण्यात येणार आहेत.
अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साड्या मिळत असल्यामुळे आणि अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिका धारकाना साड्या मिळत नसल्यामुळे अन्नसुरक्षा शिधापत्रिका धारक नाराज दिसत आहेत. शासनाने सरसकट सर्व शिधापत्रिका धारकांना साड्या दिल्या पाहिजे असे रायभोळे यांनी साड्या वाटपावेळी मत व्यक्त केले.
साड्या व पिशव्या वाटपासाठी दुकानदारांना काहीही कमिशन नाही. शासनाने दुकानदारांचाही विचार करायला हवा होता.
पिशव्या व साड्या आचासंहितेपूर्वी वाटप कराव्या, असे निर्देश पुरवठा विभागातून वारंवार दुकानदारांना देण्यात येत आहेत.

*पिशव्या….. कमिशनशिवाय वाटाव्या कशा?* असा सवाल दुकानदारांना पडला आहे.

पिशव्या व साड्या वाटप करण्यासाठी, रास्त भाव दुकानदारांना काहीही कमिशन नाही, उलट स्वखर्चाने शासकीय गोदामातून घेऊन जाऊन वाटप कराव्या लागत आहेत. रेशन दुकानदारांच्या कमिशन वाढीसाठी संघटनेची मागणी असताना, याउलट अशा वस्तू, पिशव्या व साड्या कमिशनशिवाय दुकानातून वितरित करण्यासाठी देत आहेत. याबाबत दुकानदारांमध्ये नाराजी असून शासनाने दुकानदारांचाही विचार करून, आमच्या मागण्या मान्य कराव्या. *जिल्हा सचिव प्रवीण रायभोळे*

“गंगाखेड तालुक्यात 4344 साड्या आणि 32340 पिशव्या या 163 रास्त भाव दुकानातून वाटप करण्यात येणार आहेत. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना साड्या व पिशव्या आहेत. अन्नसुरक्षा शिधापत्रिका धारकांना फक्त पिशवी आहेत. आजचा ऑनलाईन रिपोर्ट पाहता जवळपास 2000 साड्या आणि 10200 पिशव्या, 163 दुकानदारा मार्फत वितरित झाले आहेत. शिल्लक राहिलेल्या साड्या आणि पिशव्या लवकरात लवकर दुकानदारांनी वाटप कराव्यात. – *तालुकाध्यक्ष शुद्धोधन सावंत*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here