Home महाराष्ट्र बाळदी येथील उभारलेला (पाणी फिल्टर) आरो प्लॅन्ट चालु करा (प्रहार जनशक्ती...

बाळदी येथील उभारलेला (पाणी फिल्टर) आरो प्लॅन्ट चालु करा (प्रहार जनशक्ती पक्ष शाखा बाळदि शाखा च्या वतीने गटविकास अधिकारी पं.स. उमरखेड यांना दिले निवेदन)

55

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 5 मार्च) जि.प. शाळेच्या प्रांगणामध्ये गेल्या दोन वर्षापासून बसविलेले पाणी फिल्टर आरो प्लॅन्ट
हे फक्तच नावालाच उभारुन ठेवलेला आहे का? त्याचा कुठल्याच प्रकारे उ‌द्घाटन न केल्यामुळे त्यातील यंत्रणा ही पूर्ण पणे खराब झाली आहे.

त्यामुळे सदरील यंत्रणा ही निकामी झाली असून त्यास गंज लागत असल्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व पाणी फिल्टर हा कशासाठी बसविला आहे हा प्रश्न गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केलेला आहे.

शाळेतील विद्यार्थी हे पाणी पिण्यासाठी स्वतःच्या घरुन बाटल्या भरुन आणतात व हे पाणी शुध्द नसल्यामुळे त्यांना सर्दी व खोकल्याचा त्रास खूप जाणवत असल्याचा दिसत आहे.
त्यामुळे शाळेतील विद्यार्थासाठी व गावकऱ्यांसाठी लवकरात लवकर हा आरो प्लॅन्ट उपलब्ध करुन देण्यात यावा ही आपणास नम्र विनंती केली आहे.

यावेळी निवेदन देतांनी प्रवीण इंगळे (बाळदि शाखा अध्यक्ष), विवेक जळके (प्रसिद्धि प्रमुख), नितीन राठोड, संतोष हरण,प्रफुल वानखेडे, राम वटाणे इत्यादी उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here