Home राजकारण साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन मधील घड्याळ चिन्ह झाले २३ वर्षाने अदृश्य

साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन मधील घड्याळ चिन्ह झाले २३ वर्षाने अदृश्य

100

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धक्का तंत्र वापरून १९९९ साली राष्ट्रीय काँग्रेसच्या हाताचा पंजा चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अचूक वेळ साधत सोडला व घड्याळ चिन्ह घेऊन पक्षाची स्थापना केली. केंद्र व राज्य सरकारमध्ये सक्रिय सहभाग घेतला .ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये २३ वर्षांनी फूट पडल्यानंतर या पक्षाचे सातारा जिल्हा राष्ट्रवादी भवन मधील घड्याळ व त्याचे काटे अदृश्य झाले आहेत
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवन या कार्यालयावर दुपारी महिला आघाडीच्या वतीने कविता मेहेत्रे संजना जगदाळे समिंदरा जाधव, नलिनी जाधव, मोहिनी मिसाळ प्रज्ञा गायकवाड शैलेजा जाधव कदम नुपूर नारनवरे मेघा नलवडे, तेजस्विनी केसरकर डॉक्टर प्रियांका माने अर्चना सोनवणे रूपाली ननावरे अनुराधा तरटे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर महिला व
कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाचा निषेध केला. तसेच मनुवादी विचारसरणीच्या भाजप सरकार विरोधातही घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
या घोषणाबाजी मुळे काही काळासाठी भाजप समर्थक राष्ट्रवादी भवन च्या आजूबाजूला उभे राहिले होते. परंतु, त्या ठिकाणी मिरची विक्रेते असल्यामुळे मिरची व या घोषणाबाजीचाही चांगलाच झटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधक समर्थकांना बसला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून सत्तेसाठी अजित पवार यांनी वेगळा गट केला. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याही नाव घेऊन त्यांचे विरोधात घोषणा दिल्या. आज राष्ट्रवादी भवन मध्ये असलेले अजित दादा पवार यांची प्रतिमाही हटवण्यात आली. गेली २३ वर्ष सातारा येथील राष्ट्रवादी भवन मध्ये पवार कुटुंबीयांचे वर्चस्व होते परंतु आता त्यापैकी शरदचंद्र पवार साहेबांचे पुतणे अजित दादा पवार यांनी वेगळा गट केल्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व या राष्ट्रवादी भवन मधून पुसण्यास सुरुवात झालेली आहे. ही काळाची महिमा असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार गटाने सातारा लोकसभा मतदारसंघाची मागणी केली होती त्याला खिळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-एकेकाळी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन मध्ये घड्याळ हे चिन्ह अस्तित्व दाखवत होते आता या भवन मधील घड्याळ व त्याचे काटे अदृश्य झाल्याचे पाहून अनेक जणांचे डोळे पानावले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here