Home महाराष्ट्र भापकी, पळसवाडा, हातुर्णा येथील ३७० घरकुलांसाठी ६ कोटी १० लक्ष ५० हजार...

भापकी, पळसवाडा, हातुर्णा येथील ३७० घरकुलांसाठी ६ कोटी १० लक्ष ५० हजार रुपये मंजूर ! आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे पूरग्रस्तांना मिळाला दिलासा !

115

 

वरूड तालुका प्रतिनिधी /
वरुड तालुक्यातील भापकी पाळसोना हातुर्णा येथील पुनर्वसन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शासंकडे अनेक वेळा पुनर्वसित गावातील नागरिकांची घरकुले, नागरी सुविधा यासह विवीध कामांसाठी शासनाकडे अनेक वेळा बैठका घेऊन सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भापकी, पाळसोना, हातुर्णा यासह पूरग्रस्त गावातील गाव अंतर्गत रस्ते, नाल्या, पानाच्या टाक्या, वीज कनेक्शन, पेव्हर ब्लॉक, पाण्याच्या पूरक पाईप लाईन, इतर नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी भापकी पाळसोना हातुर्णा येथील नागरिकांना न्याय मिळऊन दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे ३७० घरकुलांसाठी ६ कोटी १० लक्ष ५० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे भापकी पाळसोना हातुर्णा येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोवाड महापुरामुळे सन १९९१ चे पावसाळ्यात प्रचंड महापुर आलेल्या महापुरामुळे वरूड तालुक्यातील भापकी, पळसवाडा, हातुर्णा ही ३ गावे पुर्णत: बाधित झाल्यामुळे या गावातील ३७० घरांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणेसाठी तात्काळ प्रशासकीय मान्यता प्रदान करुन घरकुलांची कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे रेटून धरल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन भापकी, पळसवाडा, हातुर्णा या गावातील ३७० घरांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणेसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्यामुळे भापकी, पळसवाडा, हातुर्णा येथील नागरिकांना दिलासा मिळऊन दिल्यामुळे येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
सन १९९१ च्या पुरामुळे बाधित झालेल्या अमरावती जिल्हयामधील वरुड तालुक्यातील हातुर्णा येथील १६७ घरकुलांसाठी २ कोटी ७५ लक्ष ५५ हजार रुपये, पळसवाडा येथील १०२ घरकुलांसाठी १ कोटी ६६ लक्ष ६५ हजार रुपये , भापकी येथील १०१ घरकुलांसाठी १ कोटी ६८ लक्ष ३० हजार रुपये, असे एकूण ३७० घरकुलांसाठी ६ कोटी १० लक्ष ५० हजार रुपये मंजूर करून या सर्व मंजूर घरांचे एक विशेष बाब म्हणून त्यांचे नवीन सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी भूसंपादित केलेल्या ठिकाणी पुनर्वसन करण्यास व त्यानुसार घरबांधणीसाठी ६ कोटी १० लक्ष ५० हजार रुपये इतक्या खर्चास शासनाने शासन निर्णय काढून मंजुरी दिल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here