Home नागपूर महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र कर्मचाऱ्यांचा नागपूर विधानसभेवर...

महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र कर्मचाऱ्यांचा नागपूर विधानसभेवर 13 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा

343

 

नागपूर- राज्य शासनाच्या आख्यारीत असलेल्या महिला आर्थिक विकास मंडळा अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या महिला बचत गटाच्या सबलीकरणाकरिता अहोरात्र परिश्रम घेऊन शासनाचे महत्त्वपूर्ण असे कार्य करणाऱ्या या लोकसंचालित साधन केंद्राचे महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे महिला आर्थिक विकास मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक शोषण करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना ना किमान वेतन कायदा लागू आहे ना पीएफ. ना इ एस आय सी लागू आहे. मागील पंधरा ते वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून या महिला व पुरुष कर्मचारी महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असून महिला बचत गटाच्या सबलीकरणा करिता राज्याच्या विविध जिल्ह्यात काम करीत आहे परंतु महिला आर्थिक विकास महामंडळ जे महिलांच्या सबलीकरणाचे काम करणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचेच शोषण व खच्चीकरण करीत आहे.
वास्तविक पाहता या कर्मचाऱ्यांनी कधीही शासनाला आम्हाला सेवेत कायम करा अशी मागणी केली नाही परंतु आम्ही जे महिला बचत गटाच्या सबलीकरणाकरिता काम करतो. त्याचा पूर्ण मोबदला आम्हाला वेतनाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे तसेच उमेदच्या धर्तीवर माविम cmrc च्या स्थापित बचत गटांना तीस हजार रुपये खेळते भांडवल ( RF) व ज्या गटांना बँक कर्ज दिले जाते अश्या गटांना 7% व्याजाचा परतावा देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. परंतु अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाने या लोकसंचालित साधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने या कर्मचाऱ्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर कंत्राटी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या त्यांच्या संघटनेच्या वतीने शासनाने त्यांच्या मागण्याची दखल घ्यायला पाहिजे. म्हणून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी पाच हजार लोकसंचालित साधन केंद्राचे महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा नागपूर विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार असून राज्यातील दूरदूरच्या जिल्ह्यातील महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी या मोर्चात सहभागी होणार आहे.

या मोर्चाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष नीताताई चौबे तसेच प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, संघटनेचे अध्यक्ष हर्षल ठोंबरे, सौ शारदा हुसे महामंत्री महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघ तसेच सुहास ताई तिवारी या करणार असून या मोर्चामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात महिला आर्थिक विकास मंडळाच्या अंतर्गत महिला बचत गटाच्या सबलीकरणाकरिता काम करणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्याकरिता मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संघपाल फुले, सुरेश गोंगले, सुजाता तोंडारे, दिलीप कळमकर, मयूर कुलकर्णी, स्वाती भैसे, कुंदा मामीडवार व पद्मावती गायकवाड, करुणा कनोजे, वंदना भिवगडे, सोनाली शेंडे यांचे तर्फे करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here