रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहुजन समाजातील लोकांना तसेच स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.कामगार संघटना स्थापन केल्या. वंचित,बहुजन लोकांना संघटित केले.मानसला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.त्यामुळेच आज प्रत्येक घरात त्यांचा फोटो असतो. मात्र निव्वळ फोटो ठेऊन चालणार नाही तर त्यांच्या विचारांनाही आत्मसात केले पाहिजे. हीच खरी डॉ.बाबासाहेबांना महापरिनिर्वाणदिनी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन पत्रकार प्रा. प्रशांत राऊत यांनी केले.ते अर्हेरनवरगाव येथे बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्य बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव रामटेके होते.तर विचारपीठावर ध्रुवा खोब्रागडे, माजी सरपंच बागडे,विशाल जनबंधु,धम्मादीप कऱ्हाडे, संघमित्रा लोखंडे,बिट जमादार अरुण पिसे,चंदन वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. राऊत पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांनी “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूल मंत्र दिला .मात्र शिक्षण घेणे म्हणजे केवळ शाळा,महाविद्यालयातील शिक्षण नव्हे तर त्या सोबतच समाजातील दैनंदिन घडामोडी,राजकीय घडामोडी यांचा अभ्यास करणे त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या प्रगतीसाठी करणे.ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत अश्यांनी एकत्रित येऊन संघटित होणे.आणि आपल्या न्याय हक्कांसाठी लढा दिला पाहिजे.त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने बाबासाहेबांचे पुस्तक वाचले पाहिजे तेव्हाच डॉ.बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचेल आणि बाबासाहेब कळायला लागतील.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव रामटेके यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत आदरांजली वाहिली.उपस्थित मान्यवरांनी डॉ.बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.सदर कार्यसक्रमाचे संचालन अमरदीप लोखंडे यांनी केले तर आभार ध्रुव खोब्रागडे यांनी केले.
