Home यवतमाळ महापरिनिर्वाणदिनी पुसद येथे भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन, आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या! ...

महापरिनिर्वाणदिनी पुसद येथे भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन, आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या! संबंधित आयोजकावर, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करा भीम आर्मीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

131

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

 

 

पुसद -येथे भाजपा कार्यालयाचे उद्घाटन करून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या प्रकरणी भीम आर्मी यवतमाळ युनिट च्या वतीने संबंधित आयोजक, व भाजपाचे मंत्री यांचेवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करा या विषयाचे निवेदन, आज दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी पुसद उपविभागीय अधिकारी, यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर 2023 रोजी महापरिनिर्वाण दिनीच जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून भाजपा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी हेतुपुस्सर फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला महापरीनिर्वान दिनी संपूर्ण भारत देशात दुःखवटा पाळला जातो परतू परंतु पुसद येथे भारतीय जनता पक्षाने मुद्दामून हा स्मृतिदिनी खोडसाळपणा करून, हा कार्यक्रम आयोजीत केला.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सविधानिकरित्या संविधानाची शपथ घेऊन संविधान पदावर विराजमान असलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते हे मात्र विशेष त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच संबंधित पक्षाचे आमदार यांच्यावर कारवाई करावी तसेच आयोजकांवर ॲक्ट्रोसीटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल होऊन कारवाई करण्यात यावी करिता आंबेडकरी जनतेच्या वतीने
भीम आर्मी, सामाजिक संघटना,वंचित बहुजन आघाडी, तसेच विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ता यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

आयोजक व संबंधित यांच्यावर कार्यवाही न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चे काढण्यात येतील याची प्रशासनाने दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देते वेळेस भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, भीमरावदादा कांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, रिपब्लिकन वार्ताचे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे,देवेंद्र खडसे,रांजेद्र नाईक, भारत कांबळे, सुधाकर चापके, मधुकर सोनावणे, ज्ञानेश्वर मेटकर, अर्जुन लाडंगे, संजय भालेराव, विपुल राठोड, समाधान वाळके,सुभाष भालेराव, वैभव सुर्यवंशी,रवी खंदारे, राहुल धुळे, शुभम ढोले,करण खंदारे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here