Home यवतमाळ उमरखेड शहरातील अनधिकृत पणे लेआऊट केलेल्यांवर कारवाई करा..!

उमरखेड शहरातील अनधिकृत पणे लेआऊट केलेल्यांवर कारवाई करा..! [पत्रकार शेख ईरफान यांची उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रार]

133

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 21 ऑक्टोंबर)
शहरातील खंड 1 व 2 मध्ये अनधिकृत लेआउट पाडून कोणत्याही डिपार्टमेंटची परवानगी न घेता विनापरवानगीने अवैध कार्य सुरू केले आहे.

संबंधित अवैध पणे ले आऊट करणाऱ्या व डेव्हलपमेंट करणाऱ्या लोकांवर करवाई करण्यात यावी अशी मागणी उमरखेड चे पत्रकार शेख इरफान यानी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केली आहे.

काही जागेवर नगरपालिकेचे प्लेग्राउंड आरक्षित केले आहे.
ते शॉपिंग मॉल व प्लॉटिंग पाडून डेव्हलपमेंट करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 ची कलम 53 54 अनुसार कारवाई करण्यात यावी. प्लॉटिंग घेणारे व्यक्तीची फसवणूक करून त्यांना अनधिकृत खरेदी न देता नोटीवर अनधिकृत विक्री व त्याला दिले जात आहे. त्यामुळे नगरपरिषद महसूल चा लाखो रुपयाचा महसूल देखील बुडत आहे. अशे निवेदनातून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here