Home महाराष्ट्र राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनासाठी मंडप उभारणी कामाचा शुभारंभ साहित्य संमेलनाच्या माध्यमातून...

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनासाठी मंडप उभारणी कामाचा शुभारंभ साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीला साहित्य क्षेत्राची आवड निर्माण होईल – आ. संग्राम जगताप

113

 

नगर : शहरातील कै. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय येथे ७ व ८ ऑक्टोबर रोजी १५ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मंडप उभारणी कामाचा शुभारंभ शब्दगंधचे मार्गदर्शक बापूसाहेब भोसले व कविवर्य प्रकाश घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष आ. संग्राम जगताप, माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रकाश घोडके, चंद्रकांत पालवे, प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक, सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष डॉ.अशोक कानडे, संयोजक समिती अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे, राज्य संघटक शर्मिला गोसावी, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, राष्ट्रवादी चे युवा जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, मसाप, सावेडी शाखेचे कार्याध्यक्ष, मराठी भाषा समिती सदस्य जयंत येलुलकर, सरोज अल्हाट, सुरेखा घोलप, स्वाती अहिरे, शामा मंडलिक, शर्मिला रणधीर , शाहीर भारत गाडेकर, डॉ. तुकाराम गोंदकर, डॉ.अनिल गर्जे, राजेंद्र चोभे, डॉ. बापू चंदनशिवे, सुदर्शन धस, माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा, संपत नलावडे, रज्जाक शेख, पी. एन. डफळ, आनंदा साळवे, बबनराव गिरी, बाळासाहेब देशमुख, शाहीर अरुण आहेर, मारुती सावंत, बाबासाहेब राऊत, डॉ. रमेश वाघमारे, सखाराम गोरे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा. डॉ. अनिल गर्जे, मारुती सावंत, बी के राऊत, देविदास बुधवंत, गणेश भूतारे, सुनील धस आदी उपस्थित होते.
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, दिनांक ७ व ८ ऑक्टोबर रोजी १५ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन कै. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद कॉलेज येथे करण्यात आले आहे, त्यासाठी आज शब्दगंधचे मार्गदर्शक बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते मंडप उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून राज्यभरातील कवी, लेखक, साहित्यिक उपस्थित राहणार आहे. नगर शहरात साहित्य क्षेत्रातील कार्यक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे, शब्दगंध साहित्यिक परिषद वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. साहित्याच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरेचे जतन होत असते, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीला साहित्य क्षेत्राची आवड निर्माण होवून त्यातून मोठ्या प्रमाणात साहित्यिक तयार होतील तसेच नगर शहर, जिल्हावासियांनी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here